जागावाटपावरून राजद-काँग्रेसमध्ये रस्सीखेच! महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत नक्की काय घडलं?
पटणा येथे १२ जून रोजी महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांची पहिली औपचारिक बैठक पडली. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), माकप (CPI-M), भाकप (CPI-ML लिबरेशन) आणि विकासशील इंसान पार्टी (VIP) या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत (Grand Alliance) मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे.
सर्व पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार करावी. महागठबंधनमधील सर्वात मोठा पक्ष RJD ने स्पष्ट सांगितले की, सर्व घटक पक्षांनी जागांची मागणी करताना जिंकण्याची क्षमता असलेल्या जागांवर आणि मजबूत उमेदवारांवर लक्ष केंद्रित करावं, असा निर्णय बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार RJD सुमारे 140 जागांवर लढण्याचा मानस बाळगते आहे, तर उरलेल्या 103 जागा काँग्रेस, VIP आणि डाव्या पक्षांमध्ये वाटण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव अंतिम नसला तरी काँग्रेसला तो मान्य होईल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसने अद्याप स्वतःची जागांची संख्या स्पष्ट केली नाही. परंतु पक्ष “गुणवत्तापूर्ण जागा” मागत असल्याचे समजते. 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसने 70 जागांवर लढून फक्त 19 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा काँग्रेसकडून अधिक जागांची मागणी झाल्यास अन्य घटक पक्षांचा विरोध होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरु यांनी सांगितले की, पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि संघटनात्मक पातळीवरही तयारी झाली आहे. त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, जागावाटपाची चर्चा वेळेपूर्वी पूर्ण होईल.
RJD नेते तेजस्वी यादव यांनी याआधी काँग्रेस नेतृत्वाला विनंती केली होती की, जागावाटपाची चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत लांबवू नये. सूत्रांनुसार, दोन्ही पक्षांमध्ये सहमती अशी असू शकते की जागांची वाटणी जमिनीवरची वास्तव परिस्थिती लक्षात घेऊनच केली जाईल. RJD चा दावा आहे की 2020 मध्ये काँग्रेसला 70 जागा देणे ही एक रणनीतिक चूक होती. VIP (विकासशील इंसान पार्टी) ने यावेळी 40 पेक्षा अधिक जागांची मागणी केली आहे आणि पक्षप्रमुख मुकेश सहनी यांना महागठबंधनच्या वतीने उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी अटही ठेवली आहे. 2020 मध्ये VIP ने NDA सोबत 20 जागांवर लढत 4 जागा जिंकल्या होत्या.
डाव्या पक्षांनी मिळून 50 पेक्षा जास्त जागांची मागणी केली असून त्यामध्ये बहुतांश जागा भाकप माले (CPI-ML लिबeration) ला देण्याचा प्रस्ताव आहे. CPI (ML) ने आपल्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी 2020 मध्ये 19 पैकी 12 जागांवरील विजय आणि 2024 लोकसभा निवडणुकीतील दोन जागांवरील विजय दाखवला आहे.
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महागठबंधनमध्ये जागावाटपाचा मुद्दा चांगलाच गहिरा होत आहे. RJD व काँग्रेसमध्ये मतभेद उफाळण्याची शक्यता असून इतर छोट्या घटक पक्षांनीही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. यशस्वी युतीसाठी सर्व पक्षांना सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे, अन्यथा आघाडीमधील मतभेद सत्ताधारी NDA साठी फायदेशीर ठरू शकतात.