 
        
        'RSS वर बंदी घातलीच पाहिजे...'; सरदार पटेलांच्या पत्राचा हवाला देत मल्लिकार्जून खर्गेंनी भाजपला आरसा दाखवला
Mallikarjun Kharge News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा बंदी घातली पाहिजे कारण तो देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी जबाबदार आहे. सर्व अराजकतेचे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, त्यावर बंदी घातली पाहिजे,” अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पण त्याचवेळी हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टिप्पण्णी केली होती. त्यांच्या या विधानानंतर खर्गेंनी ही प्रतिक्रीया दिली आहे. “सरदार पटेल जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीनीकरण करू इच्छित होते, परंतु नेहरूंनी त्यांना या विलीनीकरणापासून रोखले. पक्षाने ब्रिटीश राजवटीपासून मिळालेल्या गुलामगिरीची मानसिकता स्वीकारली आहे, अशी टिका मोदींनी केली होती.
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, “माझे वैयक्तिक मत असे आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पाहिजे. देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी संघ आणि भाजप जबाबदार आहे, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोट्या गोष्टींना सत्यात रूपांतरित करण्यात पटाईत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी संघावर बंदी घातली होती. जर तुम्ही (भाजपा) प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसला दोष देत असाल तर तुमच्या स्वतःच्या कृतींकडे पहा.” असा टोलाही खर्गेंनी यावेळी लगावला.
Ahilayangar News: साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ
“तुम्ही सत्य कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते पुसले जाणार नाही. पंतप्रधान आणि भाजप नेहमीच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील संघर्षाचे चित्रण उभे करण्याचा प्रयत्न करत असतात. पण नेहरू आणि पटेल यांच्यात खूप चांगले संबंध होते. असेही खर्गेंनी यावेळी स्पष्ट केले. पण मी भाजपला सांगू इच्छितो की दहीहंडीत दगड शोधू नका. तुमचा इतिहास सर्वांना माहिती आहे. गुजरातमध्ये पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण करणारे आणि सरदार सरोवर धरणाची पायाभरणी करणारे नेहरू हे पहिले होते.” असंही खर्गेनी यावेळी स्पष्ट केलं.
“सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान प्रचंड आहे, यावर जवाहरलाल नेहरू यांचा विश्वास होता. होते की ‘आरएसएसने गांधीजींच्या मृत्युचा उत्सव साजरा केला आणि मिठाई वाटली.’ त्यामुळे सरकारकडे आरएसएसवर बंदी घालण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता,” असे खुद्द ४ फेब्रुवारी १९४८ रोजी सरदार पटेल यांनी एका पत्रात लिहिले आहे. असंही खर्गेंनी यावेळी सांगितले. खर्गे म्हणाले की, सरदार पटेल यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे, आरएसएस आणि हिंदू महासभेच्या विचारसरणीने निर्माण केलेले विषारी वातावरण महात्मा गांधींच्या हत्येस जबाबदार ठरले. काँग्रेस नेत्यांनी या पार्श्वभूमीवर गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या विचारसरणीतील एकात्मतेवर भर दिला.






