सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त विधान (फोटो -ani)
1. सॅम पित्रोदा राहुल गांधींच्या जवळचे नेते
2. सॅम पित्रोदा इंडियन ओव्हरसीज कॉँग्रेस अध्यक्ष
3. भाजपची जोरदार टीका
Sam Pitroda Controversial Statement: इंडियन ओव्हरसीज कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उभा राहिला आहे. पाकिस्तान, बांगलादेशमध्ये मला घरात असल्यासारखे वाटते असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा भाजपने समाचार घेतला आहे. देशाच्या राजकारणात आता आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण नक्कीकाय आहे, ते जाणून घेऊयात.
सॅम पित्रोदा यांनी एका कार्यक्रमात पाकिस्तानमध्ये मला घरासारखे वाटले असे विधान केले आहे. सॅम पित्रोदा एका कार्यक्रमात म्हणाले, “आपल्या परराष्ट्र धोरणात आपण प्रथम आपल्या शेजारच्या देशांवर लक्ष दिले पाहिजे. आपण खरोखरच शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारू शकतो का? मी पाकिस्तानला गेलो आहे. मी तुम्हाला सांगतो तिथे मला घरासारखे वाटले. मी बांगलादेश, नेपाळला गेलो. तिथेही मला घरासारखे वाटले. मी विदेशात आहे असे मला कधीच वाटले नाही.”
भाजपची जोरदार टीका
सॅम पित्रोदा यांच्या विधानावर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, “राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि इंडियन ओव्हरसीज कॉँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पाकिस्तानमध्ये घरासारखे वाटते असे विधान केले. 26/11 नंतर देखील यूपीए सरकारने पाकिस्तानविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.
Indian Gen Z : भारताच्या राजकारणातही आले Gen-Z ? भाजप नेत्यांनी राहुल गांधींना केले सावधान
लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानाने राजकारण तापले आहे. भाजपा या विषयावरून कॉँग्रेसला घेण्याची शक्यता आहे. आधीच भाजपने यावरून टीका केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
भारताच्या राजकारणातही आले Gen-Z?
आपल्या शेजारील नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे मोठे रान पेटले. नेपाळमध्ये Gen-Z च्या आंदोलनामध्ये मोठा विध्वंस झाला. अवघ्या काही तासांत सरकार कोसळले तर राजकीय नेत्यांना तरुणांनी पळून पळून मारले.
Indian Gen Z : भारताच्या राजकारणातही आले Gen-Z ? भाजप नेत्यांनी राहुल गांधींना केले सावधान
राजकीय नेत्यांना त्यांचा पदभार सोडून देश सोडावा लागला. नेपाळी संतप्त तरुणांनी राजकीय नेत्यांची घरे पेटवून दिली आणि एका नेत्याच्या पत्नीला जीवंत जाळले. या आंदोलनामुळे Gen-Z ची चर्चा संपूर्ण जगात रंगली. भारतामध्ये देखील आता Gen-Z ची चर्चा सुरु झाली असून भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.