इंडिगोच्या अनेक फ्लाइट्स रद्द (फोटो- सोशल मीडिया)
इंडिगोची दिवसभरात 450 उड्डाणे रद्द
ग्राहकांना आतापर्यंत 610 कोटींचा परतावा
इंडिगो प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार
नवी दिल्ली: गेल्या आठवड्यापासून देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला आहे. इंडिगोला (Indigo) नवीन डीजीसीए नियमांनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तयार करता आले नाही, ज्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे विमानतळांवर लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना तासनतास गैरसोय सहन करावी लागली. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. 10 डिसेंबरपर्यंत ही अडचण दूर होण्याचा अंदाज आहे. याबाबत तातडीने सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगून सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?
इंडिगो प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, ‘लाखो लोक एअरपोर्टवर अडकले आहेत, हे आम्हाला समजते आहे. काहीना आरोग्याच्या समस्या आहेत, तर अनेकांना अन्य काही अडचणी आहेत. या प्रकरणाची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वेळेवर कारवाई करण्यात आली आहे. योग्य वेळेस पाहूया. सध्या कोणतीही निकड नाही.’ सुप्रीम कोर्टाने या तातडीने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतावा
देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोचे परिचालन संकट सलग सहाव्या दिवशीही कायम आहे. इंडिगोने आज, म्हणजेच रविवारी, पुन्हा ६५० हून अधिक विमाने रद्द केली आहेत. कंपनीने नियोजित केलेल्या २३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी सुमारे १६५० उड्डाणे आज ऑपरेट केली जात आहेत.
इंडिगोने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतावा
दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने रविवारी सांगितले की, इंडिगोच्या प्रवाशांना आतापर्यंत एकूण ₹६१० कोटी रुपयांचा परतावा केला गेला आहे. तसेच, कंपनीने देशभरातील प्रवाशांना त्यांच्या ३००० हून अधिक बॅग्ज देखील सुपूर्द केले आहेत. शुक्रवार आणि शनिवार: सीईओ पीटर एल्बर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १००० हून अधिक, तर शनिवारी ८०० हून अधिक विमाने रद्द झाली होती. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, कंपनी हळूहळू सामान्य परिस्थितीकडे परतत आहे. “आम्ही आता उड्डाणे पहिल्या टप्प्यातच रद्द करत आहोत, जेणेकरून ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत, ते विमानतळावर येऊ नयेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.






