Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा (Photo Credit - X)
इंडिगोने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतावा
दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने रविवारी सांगितले की, इंडिगोच्या प्रवाशांना आतापर्यंत एकूण ₹६१० कोटी रुपयांचा Refund (परतावा) केला गेला आहे. तसेच, कंपनीने देशभरातील प्रवाशांना त्यांच्या ३००० हून अधिक बॅग्ज देखील सुपूर्द केले आहेत.
IndiGo CEO Pieter Elbers says the airline operated 1,500 flights on Dec 6 and reached 1,650 flights today in an internal message to employees. This as the Aviation Ministry has said that the airline has processed refunds totaling ₹610 crore and delivered 3,000 pieces of baggage… pic.twitter.com/rDMe3iLs87 — CNBC-TV18 (@CNBCTV18News) December 7, 2025
शुक्रवारपासून संकटाची सुरुवात
शुक्रवार आणि शनिवार: सीईओ पीटर एल्बर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १००० हून अधिक, तर शनिवारी ८०० हून अधिक विमाने रद्द झाली होती. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, कंपनी हळूहळू सामान्य परिस्थितीकडे परतत आहे. “आम्ही आता उड्डाणे पहिल्या टप्प्यातच रद्द करत आहोत, जेणेकरून ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत, ते विमानतळावर येऊ नयेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील सर्वात मोठी एअरलाइन Indigo मोठ्या संकटात नेमकी का अडकली?
डीजीसीएने (DGCA) पायलटच्या ‘फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट’ (FDTL) नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे हे भीषण संकट उभे राहिले. नवीन नियमांनुसार, वैमानिकांना दर आठवड्याला मिळणारा ३६ तासांचा ब्रेक वाढवून ४८ तास करण्यात आला आहे. तसेच, रात्रीच्या वेळेत ऑपरेट केल्या जाणाऱ्या विमानांची संख्या २ पर्यंत मर्यादित करण्यात आली. या नियमांमुळे प्रत्येक वैमानिकाकडून ऑपरेट केल्या जाणाऱ्या विमानांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली.
कर्मचारी कमतरता
इंडिगोने ‘एअरबस ए३२० फ्लीट’साठी २४२२ कॅप्टनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते, पण त्यांच्याकडे केवळ २३५७ कॅप्टन उपलब्ध होते. तसेच, ‘फर्स्ट ऑफिसर’ची संख्याही कमी होती. इंडिगोचे ”लीन-स्टाफिंग” (Lean-Staffing Model – कमी कर्मचारी संख्या ठेवून कार्य चालवण्याचे मॉडेल) या नवीन DGCA नियमांमुळे पूर्णपणे कोलमडले, परिणामी दररोज शेकडो विमाने रद्द करावी लागली.






