कोरोनाने चिंता वाढवली! देशातील या भागात ७- ९ जून पर्यंत कलम १६३ लागू
देशात कोरोना संपूर्ण देशात हळूहळू पाय पसरत असून सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे गेली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्येही संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे कोरोना विषाणूमुळे लोकांची चिंता वाढत आहे. गेल्या २४ तासांत ३२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १९० वर गेली आहे. एका संक्रमित व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बीएनएसचे कलम १६३ लागू करण्यात आलं आहे, ७ जून ते ९ जूनपर्यंत ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या काळात कोणत्याही प्रकारचे धरणे निदर्शने करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. परवानगीशिवाय ५ पेक्षा अधिक लोक एकाच ठिकाणी एकत्र येता येणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे गेली आहे. यामध्ये केरळ सर्वाधिक प्रभावित आहे. त्यानंतर गुजरात, पश्चिम बंगाल आणि त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. वाढत्या रुग्णसंख्येमुळे, कोरोनाशी लढण्याची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केले जात आहेत. सर्व राज्यांना व्हेंटिलेटर, आयसोलेशन बेड, आवश्यक औषधं आणि ऑक्सिजन योग्य साठा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशात सध्या ५ हजार ३६४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत चार जणांचा मृत्यूही झाला आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, संक्रमितांवर घरीच उपचार केले जात आहेत. या वर्षी जानेवारीपासून एकूण ५५ मृत्यू झाले आहेत. नोएडाबद्दल बोलायचे झाले तर, जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, योग्य अंतर ठेवणे, वेळोवेळी हात धुणे यासारख्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय, आरोग्य विभागाने कोविड चाचणी आणि लसीकरण वाढवण्यावरही भर दिला आहे. जेणेकरून परिस्थिती नियंत्रिणता आणताय येईल. आरोग्य विभागाने तपासणीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांवरही चाचणीची व्यवस्था केली जात आहे.
Kimami Sewai: ईदचा गोडवा द्विगुणित करण्यासाठी घरात बनवा ‘ही’ आगळीवेगळी रेसिपी
नोएडा जिल्ह्यातील आणखी ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या १९० झाली आहे. यामध्ये ७९ पुरुष आणि १११ महिलांचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात ३ रुग्ण दाखल आहेत. साडेतीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या वर्षी कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. दिल्लीतील चाचा नेहरू रुग्णालयात या मुलीवर उपचार सुरू होते. आठवड्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. पोर्टलवर माहिती आल्यानंतर आरोग्य विभाग कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधत आहे.