भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात दाखल (फोटो सौजन्य-ट्विटर)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिनाभरात त्यांना दुसऱ्यांदा या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनाही गेल्या महिन्यात ३ जुलै रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. तत्पूर्वी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेथे रात्रभर ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
Veteran BJP leader LK Advani was admitted to the Neurology department today morning at Indraprastha Apollo Hospital. He is stable and under observation: Apollo Hospital (File pic) pic.twitter.com/N5yQ4bDvsn — ANI (@ANI) August 6, 2024
लालकृष्ण अडवाणी यांना 27 जून रोजी रात्री 10.30 च्या सुमारास एम्सच्या युरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री जेपी नड्डा त्यांना भेटण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. लालकृष्ण अडवाणी 96 वर्षांचे आहेत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल व्हावे लागते. ज्येष्ठ भाजप नेत्याला यावर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.






