पहिला हायस्पीड टेस्टिंग रेल्वे ट्रॅक होतोय तयार, या रेल्वे प्रकल्पासासाठी सिमेन्स कंपनीची वर्णी (फोटो सौजन्य-X)
मुंबई : अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प हा देशाच्या राष्ट्रीय रेल्वे योजना २०२३ अंतर्गत महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून गणला जातो. देशाच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची उभारणी करणा-या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड संस्थेने दिनेशचंद्र आर. अग्रवाल इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड, सिमेन्स लिमिटेड आणि सिमेन्स मोबिलिटी जीएमबीएच या कंपन्यांसोबत महत्त्वाचा करार केला आहे. नुकतीच या कराराबाबत घोषणा करण्यात आली.
या कराराची किंमत सुमारे ४ हजार १०० कोटी इतकी असून, त्यामध्ये सिमेन्स लिमिटेडचा १ हजार २३० कोटींचा वाटा आहे. हा करार प्रामुख्याने अत्याधुनिक रेल्वे सिग्नल आणि दूरसंचार प्रणालीचा आराखडा तयार करणे, तंत्रज्ञान कार्यान्वित करणे आणि दीर्घकालीन देखभाल याकरिता करण्यात आला आहे. हा प्रकल्प पुढील ५४ महिन्यांत पूर्ण केला जाईल. या तंत्रज्ञानाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी सिमेन्स कंपनीकडून १५ वर्षे सेवा पुरवली जाईल. यामुळे प्रकल्पाची दीर्घकालीन कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होईल.
या करारानुसार सिमेन्स लिमिटेड युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीमच्या (ईटीसीएस) दुस-या पातळीवरील सिग्लनिंग आणि रेल्वे वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची निर्मिती करणार आहे. हे तंत्रज्ञान ताशी ३५० किलोमीटरपर्यंतच्या गतीने धावणा-या ट्रेनसाठी फायदेशीर ठरते. यात वेळेवर धावणा-या ट्रेनची देखभाल करणे, नियंत्रण साधणे, सतत वायरलेस संवादाच्या माध्यमातून संपर्कात राहणे आणि एकसंघ ट्रॉफिक व्यवस्थापन अशा आधुनिक प्रणालींचा समावेश असेल.
या प्रकल्पाविषयी सिमेन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथूर आपली भूमिका सर्वांसमोर मांडली. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे महामंडळासोबत या महत्त्वकांक्षी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी भागीदारी करणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आम्ही मेक इन इंडिया या संकल्पनेवर निष्ठावान राहून, आपल्या देशाला आवश्यक असे टिकाऊ तंत्रज्ञान देत आहोत. हे तंत्रज्ञान भविष्यातील गरजांनाही पूरक ठरेल.’’ युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम (ईटीसीएस) ही रेल्वे सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने चालवण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक सिग्नल यंत्रणा आहे. हे तंत्रज्ञान ५० पेक्षा जास्त देशांमध्ये यशस्वीरित्या वापरले जात आहे.
23 कि.मी. हायस्पीड रेल्वे ट्रॅकची मुख्य लाईन
13 कि.मी.चा हायस्पीड लूप गुढा येथे
3 कि.मी.चा क्वीक टेस्टिंग लूप नवा येथे असेल
20 कि.मी. कर्व्ह टेस्टिंग लूप मिथ्रीमध्ये असेल
31.5 कि.मी. हायस्पीड स्ट्रेचचे काम सुरू