‘प्रेम प्रकरणात कुणाचं मन दुखावलं जाणं हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि प्रेयसीला तिच्या पालकांच्या सल्ल्यानुसारच लग्न करण्याचा सल्ला देणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणं नव्हे.’ असं मत सर्वोच्च न्यायलयानं नोंदवत एका प्रकरणात आरोपी प्रियकरावर सुरू असलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केला. त्यामुळे आरोपी प्रियकरला दिलासा मिळाला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया.
[read_also content=”आज माघी गणेश जंयती, सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, पहाटेपासून दर्शनासाठी रांगा! https://www.navarashtra.com/maharashtra/devotees-rush-in-mumbai-sidhhivinayak-temple-on-occasion-of-maghi-ganesh-jayanti-nrps-506612.html”]
सर्वोच्च न्यायालायत आलेल्या एका प्रकरणाबाबत माहिती अशी की, एका तरुणावर प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांमध्ये लग्न करण्याच्या विषयावर बोलणं सुरू होतं मात्र, त्या तरुणाने प्रेयसीला तिच्या कुटुंबियांच्या सल्ल्यानुसार लग्न करण्याचा सल्ला दिला. तसेच, दुसरीकडे तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी वधूचा शोध सुरू केल्याने पीडित मुलगी अस्वस्थ झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलं. उच्च न्यायालयानेही हा खटला फेटाळण्यास नकार दिला. त्यावर तरुणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी करताना म्हण्टलं की, या प्रकरणात कलम ३०६ अंतर्गत गुन्हा घडत नाही. आरोप आणि कायद्याचा विचार केल्यानंतर अपीलकर्त्या तरुणाची कोणतीही सक्रिय भूमिका नसल्याचे सांगितले. आत्महत्येस प्रवृत्त करणारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृती असावी. आरोपीने बोललेले शब्द निकालाचे सूचक असले पाहिजेत.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणात मुलीने आत्महत्या केली जेव्हा तिच्या प्रियकराने तिला तिच्या पालकांच्या पसंतीनुसार लग्न करण्याचा सल्ला दिला. खंडपीठाने म्हटले की, तुटलेली नाती आणि हार्टब्रेक हे दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. स्वत:ही आईवडिलांच्या मर्जीने लग्न करण्या आपलं नातं तोडून प्रेयसिला तिच्या आई-वडिलांच्या सल्ल्यानुसार लग्न करण्याचा सल्ला देणे (तो स्वतःही असेच करत होता) याला आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही.
सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की जेथे उच्चारलेले शब्द सामान्य स्वरूपाचे असतात, अनेकदा भांडण करणाऱ्या लोकांमधील क्षणाच्या रागात किंवा ओघाओघता बोलले जातात आणि त्यामुळे काही गंभीर होण्याची अपेक्षा नसते, तर ते आत्महत्येला प्रवृत्त करण्यासारखे ठरणार नाही. ‘प्रवृत्ति’चा आरोप करण्यासाठी हे दाखवले पाहिजे की आरोपीने त्याच्या कृतीने, वागण्याने किंवा चुकून सतत अशी परिस्थिती निर्माण केली की पीडितेला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.






