टाटा अल्ट्रोज नवी टेक्नॉलॉजी
कसे आहे मॉडेल
टाटा अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी मॉडेल विविध व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार निवड करता येईल. या मालिकेतील ‘प्युअर’ या बेस व्हेरिएण्टची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ८,६९,९९० रुपये आहे, तर ‘प्युअर एस’ व्हेरिएण्ट ८,९९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. मध्यम श्रेणीतील ‘क्रिएटिव्ह’ व्हेरिएण्टची किंमत ९,५९,९९० रुपये आणि ‘क्रिएटिव्ह एस’ व्हेरिएण्टची किंमत ९,८१,९९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या श्रेणीतील सर्वात प्रीमियम असा ‘अकॉम्प्लीश एस’ हा टॉप व्हेरिएण्ट १०,७६,९९० रुपयांना खरेदी करता येईल. या सर्व किमती दिल्लीतील एक्स-शोरूम दरांवर आधारित आहेत.
नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
काय म्हणाले तज्ज्ञ
लाँचप्रसंगी मत व्यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “अल्ट्रोजने आपल्या डिझाइन, सुरक्षा आणि पॉवरट्रेनच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करून प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सातत्याने नवनवीन निकष प्रस्थापित केले आहेत. सीएनजी हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा इंधन पर्याय आहे. त्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २५ मध्ये १९ टक्के आणि आर्थिक वर्ष २६ मध्ये २२ टक्के राहिले आहे.
ही वाढ आता फक्त पारंपारिक बाजारपेठांपुरती मर्यादित नसून नवीन प्रदेशांमधूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आयसीएनजी लाइन-अपमध्ये एएमटी तंत्रज्ञान सादर करून आम्ही सीएनजी वेईकल्समध्ये अधिक सुविधेसाठी असलेल्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करत आहोत. या नवीन विस्तारामुळे अल्ट्रोज आपल्या सेगमेंटमधील सर्वात वैविध्यपूर्ण आणि प्रीमियम कार ठरली आहे, जी जागा किंवा सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता कार्यक्षमता, ड्रायव्हिंगमधील सहजता आणि दैनंदिन उपयुक्तता यांचा योग्य समतोल साधते.”
अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी
१.२ लिटर रेवोट्रॉन आयसीएनजी इंजिनची शक्ती असलेली, अल्ट्रोज सीएनजी मोडमध्ये ७३.५ पीएस शक्ती आणि १०३ एनएम टॉर्क निर्माण करते. आता प्रथमच याला एएमटीसह जोडण्यात आले आहे, ज्यामुळे विशेषतः शहरातील रहदारीमध्ये ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुखद आणि सोयीस्कर होतो. आयसीएनजी तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी प्रगत सिंगल ईसीयू आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये अत्यंत सहजपणे बदल करता येतो.
सेगमेंटमधील पहिले डायरेक्ट स्टार्ट इन सीएनजी वैशिष्ट्य यातील सुविधा वाढवते आणि चढ-उतार किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान सातत्यपूर्ण कामगिरी सुनिश्चित करते. अल्ट्रोजमध्ये टीएमपीव्हीचे ट्विन-सिलेंडर आयसीएनजी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामध्ये सिलेंडर्स सामानाच्या जागेच्या खाली बसवले आहेत. यामुळे सीएनजी मोडमध्येही २१० लिटरची वापरण्यायोग्य बूट स्पेस मिळते, ज्यामुळे सीएनजी वेईकल्सबाबत असलेल्या जागेच्या कमतरतेची समस्या दूर होते, पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएण्ट्समध्ये ३४५ लिटर बूट स्पेस मिळते.
प्रीमियम डिझाइन आणि आरामदायी अनुभव
अल्ट्रोज आयसीएनजी एएमटीमध्ये ऑल-न्यू अल्ट्रोजची प्रीमियम डिझाइन शैली कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये फ्लश डोअर हँडल्स, इन्फिनिटी कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स आणि डीआरएलसह स्लीक एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. कारच्या आतील भागात प्रवासाचा अनुभव अधिक सुखद करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह लाउंज स्टाईल रिअर सीट, सॉफ्ट-टच ग्रँड प्रेस्टिजिया डॅशबोर्ड आणि हार्मनकडून विकसित केलेली इन्स्ट्रुमेंटेशन व इन्फोटेनमेंटसाठी अल्ट्रा व्ह्यू २६.०३ सेमीची ट्विन डिजिटल स्क्रीन देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, अँबियंट लाइटिंग आणि प्रशस्त मांडणीमुळे कारच्या प्रीमियम दर्जात अधिक भर पडते.
अद्वितीय सुरक्षा
अल्ट्रा-हाय-स्ट्रेंथ स्टीलसह एएलएफए आर्किटेक्चरवर आधारित असलेली अल्ट्रोज पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही पॉवरट्रेन्समध्ये ५-स्टार भारत एनसीएपी सेफ्टी रेटिंग मिळवणारी भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक आहे. यामध्ये ६ एअरबॅग्ज, ईएसपी, आयएसओएफआयएक्स आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर ही प्रमाणित वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच ३६०-डिग्री एचडी सराउंड व्ह्यू सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटो हेडलॅम्प्स आणि एलईडी फॉग लॅम्प्स यांसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्येदेखील आहेत.
मार्केटमध्ये आग लागणार! Tata Altroz नवीन अवतारात बाजारात; पाहा किंमत अन् फीचर्स…






