पाकिस्तान, बांगलादेशच्या ‘सीमा’ होणार सुरक्षित; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण घोषणा

फाळणीनंतर प्रथमच भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशला (PAK-Bangladesh) लागून असलेल्या 'सीमा' सुरक्षा संदर्भात योजना आखण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या देशाच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केली.

    नवी दिल्ली : फाळणीनंतर प्रथमच भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशला (PAK-Bangladesh) लागून असलेल्या ‘सीमा’ सुरक्षा संदर्भात योजना आखण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या देशाच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केली.

    सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 59 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शहा पुढे म्हणाले, भाजप 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सुमारे 560 किमी अंतरावर कुंपण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढील 2 वर्षांत या दोन्ही देशांच्या सीमेवरील सुमारे 6,386 किमी लांबीचे कुंपण जोडण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. भारत-पाकिस्तानमधील 2290 किमी आणि भारत-बांग्लादेशमधील सुमारे 4096 किमी पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर भेडसावणाऱ्या आव्हानांवर शहा यांनी भाष्य केले.

    जवानांची प्रशंसा

    अमित शहा यांनी विविध राष्ट्रीय कामगिरीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले. तसेच त्यांनी बीएसएफच्या प्रयत्नांची प्रशंसा देखील केली. बीएसएफ जवानांचे महत्त्व आणि त्यांची वचनबद्धता अधोरेखित केली. या दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपण उभारणे फायद्याचे ठरेलच; पण देशाचे रक्षण शूर बीएसएफ जवानच करू शकतात, असेही शहा यांनी सांगितले.