भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्याच भावाकडून गोळीबार केल्याने राजकारणात खळबळ उडाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
प्रमोद महाजन यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटनेने राजकारणात मोठी खळबळ उडाली. घरगुती वादातून त्यांच्यावर झालेला हा गोळीबार सर्वांना धक्का देणारा होता. २२ एप्रिल २००६ रोजी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या सख्ख्या भावाने,प्रवीण महाजन यांनी गोळी झाडली. या धक्कादायक घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रमोद महाजन हे भाजपचे प्रभावी आणि धोरणात्मक नेते म्हणून ओळखले जात होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत आणि निवडणूक रणनीतीत त्यांचे मोठे योगदान होते.
गोळीबाराच्या घटनेने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याचे तपासात समोर आले. उपचारादरम्यान काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाजपने एक कुशल रणनीतीकार गमावला, तर भारतीय राजकारणातही मोठी पोकळी निर्माण झाली. (Dinvishesh)
22 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
22 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
22 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






