कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असतानाच आरोग्य विभागाने केलं 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन... (फोटो - iStock)
नवी दिल्ली : मागील चार वर्षांपूर्वी जगभरामध्ये तांडव घातलेला कोरोना आता पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. पुन्हा एकदा कोरोना-19 जगभरात वेगाने पसरत आहे. तो भारतातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील एक्टिव्ह रुग्ण हे हजारो असून मृत्यू देखील झाले आहेत. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर कोरोना रुग्णांची माहिती दिली जात आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात कोरोनाचे तब्बल तीन हजार 758 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवार आणि शनिवार दरम्यान कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय 383 लोक बरे झाले आहेत. हे सर्व आकडे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 01 जून रोजी देशात कोविडचे 3,758 सक्रिय रुग्ण नोंदवले गेले. काल 263 नवीन कोरोना रुग्ण आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये १२०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
2019 प्रमाणे यावेळी केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथे सध्या कोरोनाचे 1400 सक्रिय रुग्ण आहेत, येथे फक्त 64 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. केरळनंतर दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कोविड-19 चे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कोविड-19 च्या नवीन प्रकाराबाबत सर्व राज्ये सतर्क आहेत. रुग्णालयांमध्ये पुन्हा कोविड चाचणी सुरू झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 28 मृत्यूची नोंद झाली आहे.
कर्नाटक आणि केरळमध्ये कोविडमुळे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. यासह, 01 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत देशात कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या २८ झाली आहे. तज्ज्ञांनी अद्याप संसर्ग गंभीर टप्प्यावर आलेला नसल्याचे सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आयसीएमआरचे प्रमुख डॉ. राजीव बहल म्हणाले, ‘पूर्वी कोविड-१९ चे रुग्ण दोन दिवसांत दुप्पट होत असत. पण यावेळी तसं नाहीये. संसर्गाचा दर अजूनही सौम्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने LF.7 आणि NB.1.8.1 प्रकारांना संसर्गासाठी जबाबदार मानले होते. या प्रकाराविरुद्ध कोविड लस प्रभावी राहण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोणत्या राज्यामध्ये किती रुग्ण?
Header 1 | Header 2 |
---|---|
महाराष्ट्र | 485 |
दिल्ली | 436 |
गुजरात | 320 |
पश्चिम बंगाल | 287 |
कर्नाटक | 238 |
तमिलनाडु | 199 |
उत्तर प्रदेश | 149 |
राजस्थान | 62 |
पुडुचेरी | 45 |
हरियाणा | 30 |