नवी दिल्ली : आजपासून दोन दिवस नवी दिल्लीत जी-२० शिखर परिषद होत आहे. यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. G20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit India) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) काल भारतात दाखल झालेत. तर जी-20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक त्याचबरोबर ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधीं काल दिल्लीत दाखल झालेत. त्यांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शुक्रवारी) केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध घडामोडींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या परिषदेमुळं जागतिक पातळीवर भारताचे वजन व दबदबा वाढणार असून, त्यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. पाहूया आजचा दिवसभरातील कसा असणार कार्यक्रम… (Today in New Delhi, the meeting of world leaders; How will today’s program of the G-20 summit be? Read in one click)
Happy to have welcomed @POTUS @JoeBiden to 7, Lok Kalyan Marg. Our meeting was very productive. We were able to discuss numerous topics which will further economic and people-to-people linkages between India and USA. The friendship between our nations will continue to play a… pic.twitter.com/Yg1tz9kGwQ — Narendra Modi (@narendramodi) September 8, 2023
कसा असणार कार्यक्रम?
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार
नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे. या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ समूहामध्ये दोन गट पडले आहेत. गेल्या वर्षीच्या बाली परिषदेतही तीव्र मतभेद झाले होते. यावेळीही अमेरिका आणि युरोपीय महासंघ युक्रेनचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. यामध्ये हवामान बदल आणि जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. तसेच या G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. लहान आकाराच्या अणुभट्ट्या, व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबतही चर्चा होणार आहे. दोन्ही नेते GE फायटर जेट इंजिन करारावर चर्चा करणार होते. या कराराला अमेरिकेच्या संसदेने नुकतीच मंजुरी दिली होती.
किती देशांचा G-20 मध्ये समावेश
या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. यावर्षी भारताने बांगलादेश, इजिप्त, नेदरलँड, मॉरिशस, नायजेरिया, सिंगापूर, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, ओमान या देशांना विशेष आमंत्रित केले आहे.