भारत-पाकिस्तान युद्धावर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया (फोटो- सोशल मिडिया)
रत्नागिरी: सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तान भारतातील महत्वाच्या शहरांना आणि लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारताची सुरक्षा दले पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान आता या सर्व घटनेवर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे.
माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, “आपली सैन्य दले पाकिस्तानचे कंबरडे मोडेल यात कसलीच शंका नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे आता जगभरात सिद्ध झाले आहे. दहशतवादाचा बीमोड करण्याचे काम आपले सैनिक नक्की करतील. पकिस्तान आपल्या नागरी वस्तीवर हल्ला करण्याचा भ्याड प्रयत्न करत आहे.”
पुढे बोलताना माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, “पाकिस्तान भारताच्या सीमा भागातील शाळांवर हल्ला करत आहेत हे अत्यंत भ्याड आणि निंदनीय आहे. या सगळ्या हल्ल्यांचा बदला घेतला जाईल. पाकिस्तानविरुद्ध युद्ध सुरू झालेले असताना आम्ही सगळे भारतीय आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. युद्धामध्ये सुद्धा रडीचा डाव खेळण्यात पाकिस्तान अग्रेसर
भारतीय नागरिकांना लक्ष करून पाकिस्तान कुटील डाव खेळण्याचा प्रयत्न करत आहे. ”
Video: कॅमेऱ्यात कैद झाला भारताचा काउंटर अटॅक; पाकिस्तानचे दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त
कॅमेऱ्यात कैद झाला भारताचा काउंटर अटॅक
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारत कारवाई करत आहे. दरम्यान पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार करत आहेत. आता भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानने भारताच्या अनेक महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान ज्या दहशतवादी बेस कॅम्पवरून भारतावर हल्ले करत होता. तेच बेस कॅम्प भारताने उडवून लावले आहेत. भारताने ही कारवाई कशाप्रकारे केली आहे त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
भारताच्या Fighter जेट्सचा पाकिस्तानच्या ‘या’ एअरबेसवर घातक हल्ला
भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये घुसली आहेत. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने पाकिस्तानच्या तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. भारताने रावळपिंडीजवळ असलेल्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला आहे, असे म्हटले जात आहे. मुरीद आणि सुकुर या हवाई तळांवर देखील भारताने हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.