मानवी लघुशंकेचा वापर करुन विकत होता फळांचा ज्युस, विचित्र चवीमुळे धक्कादायक घटना समोर (फोटो सौजन्य-X )
जर तुम्हाला फळांचा रस प्यायचा असेल तर शक्यतो घरात बनवून प्या. कारण बाजारात मिळणारा रस कसा तयार केला जातो हे पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल. खास करून जीमला वगैरे जाणारे लोकं तर कोलमडून पडतील. म्हणतील, यापेक्षा आपलं कोल्डड्रींक्स काय वाईट आहे? अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून समोर आली. गाझियाबादच्या लोणी भागात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. इंदिरापुरी भागातील फळांच्य ज्यूसच्या नावाखाली मानवी मूत्र प्यायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक लोकांना या रसातून विचित्र चव जाणवल्यानंतर त्यांनी विरोध केल्याने ही घटना उघडकीस आली. स्थानिक लोकांनी दुकान मालकाला रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली.
ज्यूसच्या दुकानात ठेवलेली मानवी लघुशंकेची बाटलीही सापडली. स्थानिक लोकांनी याचा व्हिडिओ बनवून पोलिसांना माहिती दिली. या तरुणांना संतप्त लोकांनी बेदम मारहाणही केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दुकान चालकासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. ज्यूस आणि मानवी लघुशंकेचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी बॉर्डर भागात पोलिसांनी फळांच्या रसात मानवी मूत्र मिसळल्याच्या आरोपाखाली २९ वर्षीय रस विक्रेत्याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन (१५) साथीदाराला ताब्यात घेतले आहे. अंकुर विहार भागातील पोलिस सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) भास्कर वर्मा यांनी सांगितले की, जनतेच्या तक्रारीवरून ही धक्कादायक घटना समोर आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा ज्यूस विक्रेता मानवी लघुशंकमध्ये फळांचा ज्युस भेसळ करुन ग्राहकांना विकत होता. मात्र फळांच्या ज्युसच्या विचित्र चवीमुळे ही घटना समोर आली.
रस विक्रेत्याचे नाव आमिर (२९) असे आहे. वर्मा यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलिस तेथे आले आणि त्यांच्या ज्यूस स्टॉलची झडती घेतली असता त्यांना मूत्राने भरलेले प्लास्टिक आढळले. त्यानुसार पोलिसांनी या संदर्भात आमिरची चौकशी केली. मात्र तो कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या किशोरवयीन साथीदाराला ताब्यात घेतल्याचे सहायक पोलिस आयुक्तांनी सांगितले. याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.