उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील शामली (UP Shamli) जिल्ह्यात तीन महिलांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर विष प्राशन केले. याची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. महिलांवर मानवी तस्करीचा (Human Trafficking) खटला सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांचे कुटुंबीयही त्यांना सोडून गेले आहेत. यामुळे नाराज होऊन हे पाऊल उचलले.
मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणाचा सामना करत असलेल्या तीन महिलांनी उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. ही घटना शुक्रवारी घडली. महिलांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जिथे त्यांच्यावर उपचार झाले.
[read_also content=”१२वीच्या पेपरला २४ गुण, तरीही क्रॅक केली UPSC, IAS चे ट्विट व्हायरल https://www.navarashtra.com/viral/viral-news-ias-officer-tweet-viral-24-marks-in-12th-class-yet-cracked-upsc-civil-service-exam-preparation-tips-read-the-story-details-here-nrvb-250107.html”]
एजन्सीनुसार, पोलिसांनी सांगितले की, तीन महिलांनी सदर सर्कल ऑफिसरच्या कार्यालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेकडून सुसाईड नोटही (Suicide Note) सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून महिलांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. मानवी तस्करीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर तिला पती आणि सासरच्या लोकांनीही सोडून दिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी शामली येथे छापा टाकून या महिलांना अटक करण्यात आली होती. मंडळ अधिकारी बिजेंद्र भडाना यांनी सांगितले की, तिन्ही महिलांना रुग्णालयात नेण्यात आले. कोतवाली पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, तिन्ही महिलांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
[read_also content=”सर्जरीनंतर गर्भवती महिलेसारखं वाढलंय या माणसाचं पोट! पत्नी म्हणते लोकं संशयास्पद नजरेने पहातात https://www.navarashtra.com/viral/man-big-hernia-looks-nine-months-pregnant-appendicitis-surgery-stomach-pain-hernia-treatment-know-the-story-details-here-nrvb-250050.html”]