नवी दिल्ली : ऐन दिवाळीत व्हॉट्स अॅपची (whatsapp) सेवा ठप्प झाल्यानं जगभरातील कोट्यवधी मोबाइल युजर्सच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅप ठप्प झाल्याने मोठी गैरसोय तसेच मेसेज पाठवण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र अखेर तब्बल पावणे दोन तासानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला. व्हॉट्सअॅप बंद झाल्यामुळं #whatsappdown हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.
[read_also content=”हे सरकार जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही, एकनाथ खडसे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला https://www.navarashtra.com/maharashtra/i-dont-think-this-government-will-long-time-runing-eknath-khadse-attack-on-shinde-fadnavis-government-339182.html”]
दरम्यान, मेटा (Meta) प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. कंपनी ‘शक्य तितक्या लवकर’ सेवा रिस्टोअर करण्यासाठी काम करत आहे. असं मेटाकडून व्हॉट्स अॅप बंद पडल्यानंतर सांगण्यात आलं होतं. आता तब्बल पावणे दोन तासानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता सेवा सुर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तसेच रिस्टोअरमध्ये एर्रर आल्यानं सेवा रिस्टोअर सेवा खंडीत झाल्यांच मेटानं (Meta) सांगितलं आहे.