'मॉर्डन डे'च्या ब्रॅडमॅनचा IPL मध्ये डेब्यू; दोन्ही हातांनी करतोय गोलंदाजी (सौजन्य : सोशल मीडिया)
कोलकाता : आयपीएलमध्ये दरवर्षी अद्भुत आविष्कार दिसून येत आहे. आता आयपीएल 2025 मध्ये, सनरायझर्स हैदराबादचा एक खेळाडू दोन्ही हातांनी गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत आला आहे. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. ज्यामध्ये कामिंदू मेंडिसने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो यापूर्वीही दोन्ही हातांनी गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत राहिला आहे. यातील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने एकाच सामन्यात एकाच षटकात दोन वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी केली.
व्यंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी यांची अर्धशतके आणि वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर 80 धावांनी मात केली. नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकापासून हैदराबादच्या गोलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सला बॅकफूटवर ढकलले.
क्विंटन डीकॉक आणि सुनील नरेन बाद झाले. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ बॅकफूटवर आला होता. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी सावध खेळी केली. या जोडीने संघाला संकटातून बाहेर काढले. अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी जोडीने ८१ धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडण्यात झिशान अन्सारीला यश आले. अजिंक्य रहाणे २७ चेंडूत ४ षटकार आणि १ चौकार मारत ३८ धावा करून बाद झाला.
हैदराबादचे स्टार ढेपाळले
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक वर्मा, ईशान किशन एकेरी धावा काढून तंबूत परतले. नितीश रेड्डी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण तोही बाद झाल्याने हैदराबादच्या विजयाच्या आशा धूसर झाल्या होत्या. दुसऱ्या बाजूने, अंगकृष रघुवंशीने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. अंगकृषने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. कामिंदु मेंडिसने त्याला झेलबाद केले. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने ६० आणि रिंकु सिंहने ३२ धावा करत कोलकाताने हैदराबादपुढे २०१ धावांचे आव्हान ठेवले होते.