नामिबियाविरुद्ध टीम इंडियाची दुसरी लढत (photo Credit- X)
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेसारख्या नवख्या संघासमोर भारताची वरची फळी पत्त्यासारखी कोसळली होती. स्टार फलंदाजांनी स्वस्तात विकेट गमावल्याने टीम इंडिया संकटात सापडली होती. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने एका टोकाकडून खिंड लढवत संयमी अर्धशतकी खेळी केली आणि संघाची लाज वाचवली. नामीबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज या चुकांतून धडा घेऊन मैदानात उतरतील.
२०२१ च्या विश्वचषकात भारत आणि नामीबिया एकदाच आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारताने ९ गड्यांनी विजय मिळवला होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल त्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. दिल्लीच्या या मैदानावर भारताने ४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून २ सामन्यात विजय तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IND vs PAK सामन्यावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया! उपाध्यक्ष Rajiv Shukla यांनी स्पष्टच सांगितलं…
भारतीय संघ सध्या ‘ग्रुप ए’ मध्ये २ गुणांसह आणि १.४५० या उत्तम नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचेही २ गुण आहेत, परंतु भारताचा रनरेट त्यांच्यापेक्षा (०.२४०) चांगला असल्याने भारत अव्वल स्थानी आहे. या गटात नेदरलँड्स आणि अमेरिका अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.
वरच्या फळीत अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्याकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे. पहिल्या सामन्यातील अपयश धुवून काढण्यासाठी या युवा खेळाडूंना नामीबियाविरुद्ध चांगली संधी आहे. तसेच, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या अष्टपैलू कामगिरीवरही भारताची मदार असेल.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.






