जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (फोटो सौजन्य - X)
Jammu Kashmir Encounter in Marathi: जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवादीचा खात्मा झाला आहे. त्याच्याकडून एके-४७ आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला. या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर येथे शोध मोहीम सुरू करण्यात आली.
यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आली. जचलदारा येथील क्रुम्हुरा गावाला सुरक्षा दलांनी वेढले होते. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे रूपांतर चकमकीत झाले. या चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला असून त्याच्याकडून एके-४७ आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. उर्वरित दहशतवाद्यांचाही शोध सुरू आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती दिली होती की हंदवाडाच्या कृमुरा जचलदरा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलिस आणि सुरक्षा दल कामावर आहेत. याबरोबरच त्याच्या घराच्या साहित्याला देखील आग लावण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी. या मागणीसाठी सतीश भोसले हा पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.
१९ जानेवारी रोजी सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले होते. मात्र, दोन्ही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी सांगितले होते की मिळालेल्या माहितीच्या आधारे, सुरक्षा दल सोपोरच्या जालोर गुर्जरपतीमध्ये शोध मोहीम राबवत होते. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली आणि बराच वेळ चालू राहिली आणि सुरक्षा दलांना चकमा देऊन दहशतवादी पळून गेले.