एक सोडुन चक्क पाच वेळा आपल्या पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्या चोरल्या म्हणून एका असामीने आपल्या गाडीत स्पिकर लावून त्यावरुन गावभर फिरत शिव्यांची लाखोली वाहील्याचा एक विडिओ आज सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो विडिओ राजापूर तालुक्यातील एका प्रख्यात गावातील असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल झाले असले तरी हा विडिओ त्या गावातील नसल्याचे मत अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
बुधवारी सकाळपासुन एक विडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. या विडिओच्या खाली हा विडिओ पाचल गावातील असल्याचे त्याच्या खालील मेसेजमध्ये नमुद करण्यात आले होते. त्यामुळे अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहणारा हा गाडीचा मालक कोण? पाचलमध्ये कोणी कुणाच्या किंबड्या चोरल्या? याची चर्चा सर्वत्र जोरदारपणे सुरु होती. हा विडिओ पाचल येथीलच आहे का? यासाठी सतत फोनाफोनी सुरु होती.
प्रत्येक जण आपल्या ओळखीच्या पाचल येथील व्यक्तीला फोन लावत होता. मात्र हा विडिओ पाचल येथील नसल्याचे प्रत्येकजण सांगत असल्याने व विडिओत दिसणारा गाव पाचल नसल्याचे सांगत असल्याने अखेर हा विडिओ पाचल गावातील नसल्याचे समोर आले. मात्र या विडिओने आज सकाळपासुन सोशल मिडियावर चांगलाच फिरत होता. शिव्याची पीएचडी केलेला हा माणुस कोण? हे मात्र त्यामुळे समजु शकले नसले तरी या व्हिडीओने आज सोशल मिडियावर खुपच धुमाकुळ घातला.