फोटो- (ट्विटर/@gypsy_nilima)
मुंबई: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनाला देशभरातून लाखो भाविक येत असतात. अनेक मोठे मोठे व्यक्ती लालबाग राजाच्या दर्शनाला येत असतात. मात्र अनेकदा आपण त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते हे पाहायला मिळते. व्हीआयपी लोकांना सन्मानपूर्वक वागणूक आणि सामान्य नागरिकांना अपमानास्पद वागून, धक्कबुकी केल्याचे व्हिडीओ दिसून येतात. लालबाग राजाच्या मंडळाविरोधात आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात अली आहे.
लालबाग राजाच्या दरबारात मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मुजोरपणा सातत्याने दिसून येत आहे. तशी एरवी देखील लालबाग राजाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी होते. मात्र सलग दोन दिवस सुट्ट्या आल्याने गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यातच मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी देखील वाढलेली पाहायला मिळत आहे. भाविकांना धक्काबुक्की करणे, मानगुटीला धरून बाजूला काढणे असे अनेक प्रकार मंडळाचे लोक करताना दिसून येत आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
If you are getting aggressive inside a temple then I don’t know what faith means pic.twitter.com/CJ9KKyEXjh
— Dr Nilima Srivastava (@gypsy_nilima) September 13, 2024
दरम्यान आता, सर्वसामान्य लोकांना दिल्या जाणाऱ्या चुकीच्या वर्तवणुकीबाबत लालबाग राजा मंडळाच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्या माध्यमातून लालबागचा राजा मंडळाचे विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या माध्यमातून गणेश भक्तांना दिला जाणारा चुकीचा वागणुकीचा संदर्भात कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सलग दोन दिवसांच्या सुट्टी असल्याने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गणेश भक्तांची गर्दी वाढल्याने मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाही अधिक वाढला. भाविकांना धक्काबुक्की, मानगुटीला धरून बाजूला फेकणे. भाविकांसोबत हाणामारी असे प्रकार अजूनही लालबागचा राजाच्या मंडळात सुरू आहेत. लालबागचा राजाचा मंडळात कार्यकर्त्यांकडून गणेश भक्तांच्या सोबत दिला जाणारा वागणुकीसंदर्भात काही व्हिडीओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकलले जात असल्याचे दिसते. देवाच्या दरबारात सर्वाना समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे. मात्र लालबागच्या राजाच्या दरबारातील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, त्यानुसार तिथे अशी वागणूक दिली जात नसल्याची चर्चा आहे.
सेलिब्रिटींची बडदास्त
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, यावर्षी एका बाजूला सर्वसामान्य भक्तांना धक्काबुक्की केली जात होती तर दुसऱ्या बाजूला उद्योगपती, सेलिब्रिटी लोकांना फोटो सेशनसह दर्शन दिले जात होते. एका अभिनेत्रीलाही महिला बाऊंसरांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्रीने याबाबत इन्स्टाग्राम पोस्ट करत खंत व्यक्त केली.