मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा चित्रपट सतत चर्चेत प्रदर्शनाआधीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट (Aliya Bhat) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका ‘गंगू’ची असेल. अनेक दिवसांपासून चाहते चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोविडचा चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम झाला असताना, गंगूबाई काठियावाडी आता या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, अभिनेत्री आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे.
[read_also content=”‘झुंड’ हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या ४ मार्चला होणार प्रदर्शित https://www.navarashtra.com/movies/the-movie-zhund-will-be-released-on-march-4-231389.html”]
‘गंगुबाई काठियावाडी’चे नवे दमदार पोस्टर रिलीज होताच चाहत्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरचे कौतुक करत बॉलिवूड सेलिब्रिटीही आलियाचे अभिनंदन करत आहेत. या चित्रपटात आलियाशिवाय विजय राज, इंदिरा तिवारी, सीमा पाहवा, अजय देवगण आणि इमरान हाश्मी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, आलियाचा गंगूबाई काठियावाडी बॉक्स ऑफिसवर अजित कुमारच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट वलीमाईशी टक्कर करताना दिसणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. नवीन पोस्टरसोबतच आलियाने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. ४ फेब्रुवारीला ट्रेलर रिलीज होणार आहे. पोस्टर शेयर करत आलियाने सांगितले त्याला कॅप्शन दिलयं की गंगू येत आहे…
[read_also content=”गुलाबी आणि काळ्या रंगाच्या शरारामध्ये खुललं मौनीचं सौंदर्य…पाहा फोटोज https://www.navarashtra.com/latest-news/mauni-roy-spotted-in-camera-in-pink-and-black-dress-nrps-231248.html”]