कसा झाला अपघात
भंडारा शहरातील एसटी डेपोच्या आवारात रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे रोहित खेडकर (३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर असे आहे. रोहित यांचा पाण्याचा आरो प्लांटचा व्यवसाय आहे. ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. खाली झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीनं एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बसने दुचाकीला धडक दिली, यात दोघांचाही घटनास्थळीचं मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शहरातील शेकडो नागरिक घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात जमा झाले होते. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त एसटी डेपो परिसरात तैनात करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
भंडाऱ्यात वाघाचा धुमाकूळ; 15 दिवसांत 2 जणांचा बळी, वाघाच्या भीतीने मुले शाळेत जाईना; गावकऱ्यांत भीती
भंडारा जिल्ह्यातील साकोली मध्ये नवेगाव व्याघ्र प्रकल्प आहे. याला लागून असलेल्या जंगलात नेहमीप्रमाणे प्राण्यांचा वावर असतो. मात्र गेल्या १५ दिवसात वाघांनी एवढा धुमाकूळ घातला आहे. त्याने या परिसरात दोन जणांचा जीव घेतला त्याने भीतीच वातावरण तयार झाल आहे. १९ तारखेला बांपेवाडा परिसरात एक शेतकरी शेतावर गेला होता. तेव्हा त्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर २७ मार्च ला उमर झरी इथ पण त्याने एका महिलेवर हल्ला केला आणि वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्युमुखी पडली आहे. वसंत मोहफुल आणि माया सोनवणे अशी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची नाव आहेत. साकोली मधील बांपेवाडा, उमरझरी आणि आमगाव परिसरात ही घटना घडली आहे. या सगळ्या भागात वाघामुळे भीतीच वातावरण आहे लोक बाहेर पडायला घाबरत आहेत.
वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त
Ans: भंडारा शहरातील एसटी डेपो परिसरात.
Ans: रोहित खेडकर (30) आणि त्यांचा 3 वर्षांचा मुलगा रौनक खेडकर यांचा मृत्यू झाला.
Ans: एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.






