चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्मिता पाटील हिची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
चित्रपटसृष्टीतील एक शुक्रतारा म्हणून अभिनेत्री स्मिता पाटीलला ओळखले जाते. तिने जगाचा निरोप घेतला असला तरी आजही ती प्रेक्षकांच्या मनामध्ये जीवंत आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून आपल्या अभियनाची छाप सोडणाऱ्या स्मिताने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या प्रभावी आवाज, देखणं व्यक्तीमत्व आणि अभिनय कौशल्य यामुळे अल्पावधीच स्मिताने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 17 ऑक्टोबर 1955 रोजी तिचा जन्म झाला. तिने पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेमध्ये शिक्षण घेतले. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले.
17 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
17 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
17 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष