राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन; नगर जिल्ह्याच्या राजकारणात शोककळा
Shivaji Kardile Passes Away: राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडला. मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात आपले स्थान निर्माण केले. शिवाजीराव कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते. त्यांच्या निधनाने स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक नेते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शिवाजीराव कर्डिले यांचा नगरशहाराजवळील बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. माजी मंत्री व आमदार म्हणून आपले स्थान निर्माण केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा अशा विविध पक्षांत त्यांनी वेगवेगळी पदेही भुषवली.
ते 2009 मध्ये अपक्ष म्हणून आमदारपदावर निवडून आले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली, पण पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 मध्ये पुन्हा आमदारकी लढवत विजय मिळवला, तर 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. 2014 च्या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. त्यांच्या निधनाने स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवाजीराव कार्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Pune Police Transfer News: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदली; गुन्हे आणि वाहतूक शाखेत मोठा फेरबदल