(फोटो - सोशल मिडिया)
दि. ३० एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली
आता पर्यंत ३८ हजार ९४० हून आधीक प्रवेश
‘आरटीई’ प्रवेशासाठी देण्यात आली मुदतवाढ
पुणे: आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सोडत (लॉटरी) द्वारे निवड (Career News) झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणी आणी प्रवेश निश्चित करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही मुदत आता २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान वाढविण्यात आली आहे. अशी माहीती प्रसिद्धिपत्रका व्दारे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी देली.
दिलेल्या कालावधीत पालकांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. या अनुषंगाने आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
‘आरटीई’ आकडेवीरी
प्रवेशाची शेवटची तारीख ३० एप्रिल
शाळा – ८,७०१
अर्ज नोंदणी – २,८९,२८६
विद्यार्थ्यांची निवड – १,०५,८११
प्रतीक्षा यादी – ८६,०३४
विद्यार्थी प्रवेश – ३८,९८९
‘RTE’ प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव
राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव दिसून येत असून, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सहा दिवसांत केवळ २५ हजार ६४५ हून आधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
RTE प्रवेशासाठीचा ‘तो’ निर्णय शिथिल; विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा
शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये एकूण १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची निवड यादीत नावे आली आहेत, त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून शाळांमध्या प्रवेश घेणे बंधनकार आहे. मुदत वाढ देण गरजेच आहे. हे स्पष्ट दिसत आहे.
Right To Education प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टाचा झटका; जाचक निर्बंध रद्द
मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत चौकशी समिती सक्रिय दिसत नाही. तसेच पालकांना आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये वडिलांनाच ग्राह्य धरण्याची पद्धत असून, आईलाही समान पालक म्हणून मान्यता दिली पाहिजे. प्रवेश प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.






