MI Vs GT Live Streaming (फोटो- ट्विटर)
तिलक वर्माने लगावले शानदार शतक
गुजरात टायटन्सला जिंकण्यासाठी 200 रन्सचे आव्हान
मुंबईचा गुजरातवर 99 रन्सने विजय
Tata IPL 2026 GT Vs MI Live Updates: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना पार पडला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय शुभमन गिलने घेतला होता. मुंबई इंडियन्सने फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 199 रन्स केले. तिलक वर्माने वादळी शतक ठोकले आहे. गुजरातला विजयासाठी 200 रन्सची गरज होती. अखेर या सामन्यात gउजरत टायटन्सचा 99 रन्सने पराभव झाला आहे. गुजरातचा संघ 100 रन्सवर ऑल आउट झाला. मुंबई इंडियन्सने 6 पैकी 2 सामने जिंकले असून पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानवारून 7 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
मुंबईच्या संघाने दिलेले 200 रन्सचे आव्हान गाठण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. मात्र साई सुदर्शन एकही रन करता आउट झाला. शुभमन गिलने 3 चौकार मारून चांगली सुरुवात केली. मात्र 14 रन्स केल्या आणि गिल आउट झाला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला जोस बटलर देखील 5 रन्स करून बाद झाला.
That winning feeling 🥳@mipaltan fans, how delighted are you? 😉 Scorecard ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI pic.twitter.com/7U2ABgTRsK — IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
गुजरात टायटन्सचा संघ सलग दोन विकेट गेल्यामुळे अडचणीत सापडला. मात्र वॉशिंग्टन सुंदरने 26 रन्सची महत्वाची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. त्यापाठोपाठ ग्लेन फिलिप्स 6 रन्स करून आउट झाला. तर राहुल तेवतिया केवळ 8 रन्स करून आउट झाला.
GT VS MI Live: तिलकचा गुजरातच्या ‘वर्मा’वर घाव; शतकी प्रहाराने टायटन्सचा खेळ खल्लास, विजयासाठी….
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. आजचा सामना जिंकायचा त्या दृष्टीनेच मुंबईचे गोलंदाज आज मैदानात उतरल्याचे दिसून आले. आज मुंबईच्या संघात मोठे बदल करण्यात आले होते. अखेर 6 सामन्यात जसप्रीत बुमराहला यंदाच्या आयपीएलमध्ये 1 ली विकेट मिळाली. हार्दिक पंड्याने देखील 1 विकेट मिळवली. तर आज पहिल्यांदाच संधी मिळालेल्या अश्वनी कुमारने एकूण 4 विकेट्स पटकावल्या.
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडाने जबरदस्त गोलंदाजी केली. रबाडाने मालेवर आणि डी कॉक या सलामीच्या जोडीला नेस्तनाबूत केले. रबाडाने सलग तीन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने सेट झालेल्या नमन धीरला आउट केले. मोहम्मद सिराजने हार्दिक पंड्याची विकेट घेतली. ग्लेन फिलिप्सने पंड्याचा अप्रतिम असा झेल पकडला.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने आज आपल्या संघाने अनेक बदल केल्याचे पाहायला मिळाले. दानिश मालेवर या 22 वर्षीय खेळाडूने आज मुंबईकडून डेब्यू केले. मात्र पहिल्या सामन्यात दानीश चांगली खेळी करू शकला नाही. 2 रन्स करून आउट झाला. त्या पाठोपाठ क्विंटन डी कॉक केवळ 13 रन्स करून आउट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीर खेळण्यासाठी आले.
गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडाने जबरदस्त गोलंदाजी केली. रबाडाने मालेवर आणि डी कॉक या सलामीच्या जोडीला नेस्तनाबूत केले. रबाडाने सलग तीन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने सेट झालेल्या नमन धीरला आउट केले. मोहम्मद सिराजने हार्दिक पंड्याची विकेट घेतली. ग्लेन फिलिप्सने पंड्याचा अप्रतिम असा झेल पकडला.
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक) , वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स्, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अशोक शर्मा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
MI VS GT Live: अहमदाबादमध्ये घोंघावले Tilak Verma चे वादळ; गुजरातविरुद्ध झळकावले आपले पहिले शतक
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिचेल सँटनर / ए. एम. गझनफर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, दानिश मालेवर, अश्वनी कुमार.






