तिलक वर्माने लगावले शानदार शतक (फोटो- ट्विटर)
तिलक वर्माने ठोकल्या 101 रन्स
गुजरात टायटन्सला दिले 200 रन्सचे टार्गेट
प्रसिद्ध कृष्णाने दिल्या सर्वाधिक धावा
Tata IPL 2026 Live Updates GT Vs MI: आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे. गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सने 199 रन्स केल्या. गुजरात टायटन्सला 200 रन्सचे टार्गेट दिले आहे. त्यात मुंबईकडून तिलक वर्माने शानदार शतक लगावले आहे. 45 चेंडूत 101 रन्स करून मुंबईच्या संघाला 199 रन्सपर्यंत पोहोचवले आहे.
सुरुवातीचे काही चेंडू तिलक वर्मा अगदी सावकाशपणे खेळत होता. त्यानंतर हार्दिक पंड्या खेळण्यासाठी आल्यानंतर तिलक वर्माने शानदार खेळी केली. त्यानंतर त्याने तुफानी खेळी करत शानदार शतक लगावले. 45 चेंडूत 101 रन्सची खेळी केली. त्याने 15 व्या ओव्हर्सनंतर त्याने चौकार, षटकार लगावले. त्यामुळे मुंबईच्या संघाने 199 रन्सपर्यंत मजल मारली. त्यामध्ये 101 रन्स तिलक वर्माने केले.
4⃣5⃣-ball Hundred 🤯 Tilak Varma, TAKE A BOW 👏👏 Scorecard ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI | @mipaltan | @TilakV9 pic.twitter.com/JpC1WB7lHZ — IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने आज आपल्या संघाने अनेक बदल केल्याचे पाहायला मिळाले. दानिश मालेवर या 22 वर्षीय खेळाडूने आज मुंबईकडून डेब्यू केले. मात्र पहिल्या सामन्यात दानीश चांगली खेळी करू शकला नाही. 2 रन्स करून आउट झाला. त्या पाठोपाठ क्विंटन डी कॉक केवळ 13 रन्स करून आउट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीर खेळण्यासाठी आले.
GT VS MI Live: तिलकचा गुजरातच्या ‘वर्मा’वर घाव; शतकी प्रहाराने टायटन्सचा खेळ खल्लास, विजयासाठी….
सूर्यकुमार यादव 15 रन्स करून बाद झाला. त्यामुळे मुंबईचा संघ काहीसा अडचणीत सापडला होता. मात्र तिलक वर्मा आणि नमन धीरने मुंबईचा डाव सावरला. नमन धीरने 45 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. हार्दिक पंड्या येताच तिलक वर्माने प्रसिद्ध कृष्णाच्या एका ओव्हरमध्ये 17 रन्स केल्या. तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले. हार्दिक पंड्या 15 रन्स करून आउट झाला.
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक) , वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स्, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अशोक शर्मा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
मैदानावर हे काय घडले? प्रिती झिंटा आणि अर्शदीप सिंगच्या ‘त्या’ मिठीची जोरदार चर्चा, Video Viral
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिचेल सँटनर / ए. एम. गझनफर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, दानिश मालेवर.






