jitendra Awhad-sharad pawar
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश दिली आहेत.
या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विजयाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आली होती. पण निवडणुकीत हा पराभव कशामुळे झाला, याची माहिती घेण्यासाठी आता आव्हाड आणि टोपे यांना बोलवण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची सर्व मते जयंत पाटील (Jayant Patil) यांना मिळणे अपेक्षित होते. पण तिही न मिळाल्याने राष्ट्रवादीची मतेही फुटल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
शरद पवार यांच्या पक्षाची 12 मते आणि शेकापचे एक मत तेरा मते जयंत पाटील यांना मिळणे अपेक्षित होते. पण जयंत पाटील यांना पहिल्या फेरीत फक्त 12 मते मिळाली. तर जयंत पाटील यांनी स्वत:ला पहिल्या पसंतीची 20 मते मिळणे अपेक्षित होते. पण त्यांना 12 मते मिळाली. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून पराभवाची कारणे शोधली जात आहेत. त्यानंतर आता शरद पवार स्वत: जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडून या पराभवाची माहिती घेणार आहेत. या भेटीच्या वेळी जयंत पाटीलही उपस्थितीत असतील, असेही सांगितले जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची 12 मते होती. काँग्रेस, शेकाप आणि माकप यांच्या मदतीने जयंत पाटील पुन्हा विजयी होतील अशी शक्यता होती. मात्र जयंत पाटील यांना 12 मते मिळाली. काँग्रेसने आपल्याला मदत केली नाही नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी निकालानंतर केला. नाराजी जाहीर करत ते तडकाफडकी अलिबागला निघून गेले. विशेष म्हणजे जयंत पाटील यांना काँग्रेसची मते मिळाली नाहीच, पण शरद पवार गट माकप किंवा शेकाप यांची मतेही फुटल्याचे बोलले जात आहे.