(फोटो सौजन्य - Instagram)
कलर्सवरील ‘बालिका वधू’ या मालिकेत आनंदीची भूमिका साकारून अभिनेत्री अविका गौरला घराघरात ओळख मिळाली. आता ती तिच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करणार आहे. वयाच्या २७ व्या वर्षी तिने तिचा जुना प्रियकर मिलिंद चांदवानीशी गुपचूप सारखपुडा केला आहे. आता तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यावर चाहते मनापासून प्रेम व्यक्त करत आहेत. तिच्या या बातमीने त्यांना देखील खूप आनंद झाला आहे.
अविका गौर आणि मिलिंद चांदवानी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. २०२० मध्ये, कोरोना काळात, अविकाने तिचे नाते अधिकृत केले आणि चाहत्यांना मिलिंदबद्दल सांगितले. आता २०२५ मध्ये, त्यांनी त्यांच्या प्रेमाला एक नवीन नाव दिले आहे. अविका आणि मिलिंदच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते त्यांचे आता अभिनंदन करत आहेत.
फोटोमध्ये चमकली दोघांची जोडी
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या फोटोंमध्ये, अविका अतिशय साध्या पण सुंदर लूकमध्ये दिसत आहे. गुलाबी रंगाच्या प्रिंटेड साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने हलक्या मेकअपसह केस मोकळे ठेवले आहेत आणि मिलिंद निळ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे. एका फोटोमध्ये अविका त्याला प्रेमाने किस करतानाही दिसत होती. या दोघांचे फोटो खूपच सुंदर आले आहेत. आणि दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.
‘Housefull 5’ मध्ये बीग बी आणि अनिल कपूर साकारणार होते ‘हे’ पात्र, नक्की कुठे अडलं ?
अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली माहिती
अविकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. तिने पोस्टसोबत कोणतेही मोठे कॅप्शन लिहिले नाही, फक्त काही प्रेमाने भरलेल्या फोटोंद्वारे चाहत्यांसोबत तिचा खास क्षण शेअर केला आहे. चाहते या जोडप्याला खूप प्रेम देत आहेत आणि लग्नाच्या तयारीसाठी देखील उत्सुक आहेत. अविका गौरने साखरपुड्याच्या फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘त्याने विचारले, मी हसले, मी रडले आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सोपा हो म्हणून ओरडलो. मी खूप फिल्मी आहे, बॅकग्राउंड स्कोर, स्लो-मो स्वप्ने, काजल लावणे आणि सर्व काही. आणि तो तर्कसंगत, शांत आणि कोणत्याही परिस्थितीत प्रथमोपचार किट घेऊन जणारा आहे.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.