Photo Credit- X@Medha Kulkarni पुण्यात हिरवा रंग दिलेल्या भिंतीला मेधा कुलकर्णींनी भगवा रंग लावला
पुणे : पुण्यातील एका भिंतीला हिरवा रंग देऊन फुलांनी सजवण्यात आले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर या प्रकरणाला वेग आला. सोशल मीडियावरच एका विशिष्ट धर्मावर हे जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप होऊ लागला. यावर भाजप नेत्या मेधा कुलकर्णी संतप्त झाल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी हिरव्या रंगावर भगवा रंग लावून मंदिर बांधले. तसेच देवाचे चित्र ठेवले.
पुणे शहरातील सदाशिव पेठेत असाच प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केवळ पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रासह इतरही अनेक ठिकाणी असे प्रकार वाढल्याचा आरोप केला आहे. यानंतर मेधा कुलकर्णी यांनी स्वतः जाऊन भिंतीला भगवा रंगवून सोशल मीडियावर पोस्ट केला.
Prajakta Mali News: ‘त्या’ सर्वांवर कारवाई होणार…; प्राजक्ता माळीच्या भेटीनंतर फडणवीसांचे आश्वासन
मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप viral झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि श्री. दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत.
“आम्ही भगवे पांघरलेले आहोत. आम्ही श्री राम पुजारी आहोत. असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. लोकांशी फोन नंबर शेअर करताना त्यांनी लिहिले की, “माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया . आवश्यकता लागल्यास आम्हाला नक्की सांगा माझा दूरध्वनी क्रमांक इथे देत आहे.”
प्रेमप्रकरणातून तरूणीची हत्या; मृतदेह फेकला जंगलात अन् नंतर त्याच आरोपीनं
मेधा कुलकर्णीच्या या भूमिकेवर ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात. खासदारांनी राज्याच्या, देशाच्या बेटरमेंटसाठी काही महत्त्वाचे धोरणात्मक आणि दूरदुष्टी ठेवून विकासाचे आराखडे आखावेत आणि त्यांच्या अंमलबजावणीचे काम करावे, ही अपेक्षा असते. पण खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कोणतातही हिरव्या रंगांचा कोपऱ्याला भगवा रंग देऊन अत्यंत बालिशपणाचे वाटणारा फोटो काढून ट्विट केला आहे. धार्मिक क्षेत्रात कुणी काम कराव यावर बंधन असण्याचं काही कारण नाही. त्यांनी ते केंलच पहिजे. पण जर तुम्हाला धार्मिक क्षेत्रात काम करण्याची एवढी आवड असेल तर तुम्ही धार्मिक क्षेत्रात स्व:लाच अगदी झोकून दिलं पाहिजे. मग खासदार, राजकारण या सर्व गोष्टी अतिशय शुल्लक आहेत त्यापुढे. दुसरा कुणीतरी खासदार होईल आणि तो देशाचे आणि राज्याचे प्रश्न मांडेल. तुम्ही धर्मासाठी काम केलं पाहिजे. पण जर तुम्ही खरचं खासदार असाल तर तुम्ही देशाचे प्रश्न मांडा, पण हा बालिशपणा थांबवा, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं आहे.