फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. घरातील कामांपासून ते करिअरच्या संधी आणि शिक्षणाच्या पद्धतीपर्यंत, AI आपलं जीवन अधिक सोपं, स्मार्ट आणि कार्यक्षम बनवत आहे. घरातील छोट्या-मोठ्या कामांमध्ये AI आधारित उपकरणे आपली मदत करत आहेत. उदाहरणार्थ, Alexa, Google Assistant सारखी व्हॉईस कमांड डिव्हाइसेस तुमच्यासाठी दिवे लावणे, गाणी वाजवणे, अलार्म लावणे, रेसिपी सांगणे यासारखी कामं झटपट करतात. AI आधारित रोबोट व्हॅक्युम क्लिनर घर स्वच्छ ठेवतात. काम करणाऱ्या महिलांसाठी, वृद्ध व्यक्तींसाठी ही तंत्रज्ञान एक वरदानच ठरत आहे.
करिअर प्लॅनिंगसाठी AI चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. LinkedIn, Coursera, UpGrad यांसारखे AI-आधारित प्लॅटफॉर्म्स तुमच्या आवडी, कौशल्य आणि शिक्षणाच्या आधारावर कोर्स आणि नोकऱ्या सुचवतात. AI टूल्सच्या मदतीने रिझ्युमे तयार करणे, कव्हर लेटर लिहिणे आणि इंटरव्ह्यूची तयारी करणे शक्य होते. कंपन्याही AI वापरून योग्य उमेदवार निवडतात, ज्यामुळे वेळ आणि श्रम वाचतो.
Khan Academy, BYJU’S, Duolingo यांसारख्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स AI चा वापर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार कंटेंट देतात. वर्चुअल ट्यूटर आणि चॅटबॉट्स विद्यार्थ्यांचे प्रश्न क्षणार्धात सोडवतात. त्यामुळे शिकणे अधिक वैयक्तिक, सुलभ आणि सुसंगत बनते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही यामुळे दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होते.
AI मुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडून येत आहे. घर, कार्यालय किंवा शाळा प्रत्येक ठिकाणी ही तंत्रज्ञान आपले काम सोपे करत आहे. जर योग्य प्रकारे वापर केला, तर AI ही केवळ सोय नाही, तर भविष्याची नवी दिशा आहे. हे आपल्या जीवनात केवळ वेळ आणि श्रम वाचवत नाही, तर आपली उत्पादकता आणि गुणवत्ता देखील वाढवत आहे.