मुंबई : शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी शरद पवारांबददल (sharad pawar) केलेल्या वक्तव्यावरुन वातावरण जरा तापलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाहीत. असं संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रकाश आंबेडकरांना म्हण्टल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनीही संजय राऊत यांना प्रत्तुत्तर दिलं आहे.
[read_also content=”भीकेला लागलेल्या पाकिस्तान! एका डॉलरसाठी मोजावे लागत आहेत भारताच्या तुलनेत तिप्पट पैसे, श्रीलंकेसारखी स्थिती होणार का? https://www.navarashtra.com/world/due-to-economic-currency-pakistani-currency-going-down-as-compare-to-u-s-dollar-nrps-364834.html”]
संजय राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं. “मला उद्धव ठाकरेंनी सांभाळून बोला असं सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युतीची चर्चा सुर असताना मोठा गाजवाजा करत दोन्ही पक्षामध्ये युती झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबददल वक्तव भाजपचेच असल्याचं मत व्यक्त केलं. या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांनी चांगलच सुनावलं आहे.आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकरचांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाहीत. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचितची युती झाली. आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि वंचित यात प्राथमिक चर्चाही झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत अशाप्रकारची विधाने करणे आम्हाल मान्य नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिका घेण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जपून बोलायला हवं. असं ते म्हणाले’ होते.
‘शरद पवार हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्त्व्यानंतर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रया येत आहेत.