सौजन्य - BCCI
ICC World Test Championship : भारतीय संघाने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तेथे त्यांचा पराभव झाला. भारतीय संघ नेहमीच फलंदाजीसाठी ओळखला जातो. टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये या 5 फलंदाजांनी दर्जेदार कामगिरी करीत मोठी धावसंख्या उभारली परंतु यातील 2 फलंदाज सध्या टीममधून बाहेर आहेत.
रोहित शर्मा
भारताकडून कसोटी चॅम्पियनशिपमध्ये कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याने 32 सामने खेळले असून 50 च्या सरासरीने 2552 धावा केल्या आहेत. रोहितने या कालावधीत 9 शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत. त्याने कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्याच चक्रापासून कसोटीत सलामी करण्यास सुरुवात केली.
विराट कोहली
विराट कोहलीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्मापेक्षा चार सामने आणि 6 डाव जास्त खेळले आहेत. विराटच्या नावावर ३९.२१ च्या सरासरीने २२३५ धावा आहेत. विराटने या कालावधीत 4 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. मुलाच्या जन्मामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सहभागी झाला नव्हता.
चेतेश्वर पुजारा
चेतेश्वर पुजारा भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. चॅम्पियनशिपच्या सुरुवातीला तो आघाडीचा फलंदाज होता. ऑस्ट्रेलियातील विजयात त्याची भूमिका महत्त्वाची होती. मात्र 35 सामन्यांच्या 62 डावांमध्ये त्याची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. पुजाराच्या नावावर १७६९ धावा आहेत. यात फक्त एक शतक आहे.
अजिंक्य रहाणे
भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेही टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या वर्षी त्याने पुनरागमन केले पण त्याला यश आले नाही. रहाणेने 29 सामन्यांत 34.54 च्या सरासरीने 1589 धावा केल्या आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने २०१९-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका जिंकली होती.
ऋषभ पंत
ऋषभ पंतने २०२२ नंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. यानंतरही तो धावा करण्याच्या बाबतीत टॉप-5 मध्ये कायम आहे. पंतने 24 सामन्यांच्या 41 डावांमध्ये 41.44 च्या सरासरीने 1575 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट ७३.५६ होता. या काळात त्याने तीन शतकेही झळकावली आहेत.