अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहयला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 7,178 रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय प्रकरणे 67,806 वरून 65,683 वर आली आहेत. काल देशात 12,193 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
[read_also content=”ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंचा पुन्हा एल्गार! जंतर मंतरवर निदर्शन सुरू, दिल्ली पोलिसांनी क्रीडा मंत्रालयाच्या चौकशी समितीकडून मागवला अहवाल Navarashtra News Network Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम https://www.navarashtra.com/india/indian-wrestler-protest-against-wfi-president-brij-bhushan-sharan-singh-in-delhi-nrps-390846.html”]
गेल्या 24 तासात देशात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,345वक गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातली दैनंदिन सकारात्मकता दर 9.16 टक्के नोंदविला गेला आहे आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 5.41 टक्के आहे.
COVID-19 | 7,178 new cases recorded in India in the last 24 hours; Active cases stand at 65,683 — ANI (@ANI) April 24, 2023
शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोविड केसेसच्या ट्रेंडमध्ये वाढ होण्यासाठी XBB.1.16 हे कोविड प्रकरणांमध्ये सध्याच्या वाढीसाठी जबाबदार कोविड-19 प्रकार आहे. तथापि, शास्त्रज्ञ म्हणतात की भारतातील लोकांमध्ये संकरित प्रतिकारशक्ती (लसीकरण आणि नैसर्गिक संसर्गामुळे) विकसित झाली आहे.
त्यामुळे, सध्याच्या कोविड-19 प्रकारांमुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी होणार नाही. कारण ते सौम्य स्वरूपाचे आहे. तथापि, सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आणि अद्याप केले नसल्यास त्यांचे लसीकरण डोस पूर्ण करण्याचे सुचवले आहे.