अभिनेत्री मौनी रॉयनं सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर हनीमूनसाठी काश्मीरला गाठलं आहे. अलीकडेच मौनीनं तिथले काही सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. त्याच वेळी, सूरजने त्याच्या सोशल मीडिया स्टोरीवर त्याच्या हॉटेलची एक झलकही दाखवली. फोटोंमध्ये मौनी हाय नेक स्वेटर आणि ब्लॅक डेनिम जीन्स परिधान केलाय. तर, सूरज रंगीबेरंगी स्वेटरसह फॉर्मल पॅंटमध्ये दिसत आहे.
मौनीने फोटो शेअर करत लिहिले, “सध्या SunMoon-ing।” तिच्या या फोटोंना चाहत्यांसह सेलेब्सची देखील पंसती मिळत आहे. “तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात… असेच एकत्र राहा. असे प्रेमळ कमेंट या दोघांना मिळत आहेत. एका यूजरने लिहिले, की “तुम्ही दोघे अप्रतिम आहात.” तर तिसऱ्या यूजरने लिहिलयं की, “तुम्ही दोघे एकत्र छान दिसता. 27 जानेवारीला गोव्यात मौनी आणि सूरजचं लग्न झालं. दोघांनी कुटुंब, जवळचे मित्र आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मल्याळी रितीरिवाजांनुसार आणि नंतर बंगाली परंपरेनुसार लग्न केले. कोविड-19 मुळे दोघांनीही पाहुण्यांची यादी मर्यादीत होती. सूरजबद्दल बोलायचे झाले तर तो दुबईचा बिझनेसमन आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
[read_also content=”समंथा प्रभूच्या आधी नोरा फतेहीला ऑफर झालं होतं गाणं, ‘या’ कारणामुळे दिला नकार https://www.navarashtra.com/movies/before-samantha-prabhu-nora-fatehi-was-offered-a-song-but-she-refused-becaused-nrps-234174.html”]
मौनीबद्दल बोलायचे झाले तर ती मूळची पश्चिम बंगालच्या कूचबिहारची आहे. दिल्लीत शिक्षण पूर्ण करून ती मुंबईत आली. मौनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे, जो तीन भागात बनत आहे. चित्रपटाचा पहिला भाग ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मौनीशिवाय रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि डिंपल कपाडिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
[read_also content=”दीपक जसवाल प्रसिद्ध गायक अमेय दाते यांच्या साथीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/movies/deepak-jaswal-announces-association-with-famous-singer-amey-date-know-the-details-in-marathi-nrvb-234223.html”]