भोकरदनमध्ये अवकाळी पावसाचा फटका आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी आहे (फोटो - सोशल मीडिया)
भोकरदन : तालुक्यातील अनेक भागात सुरुवातीला परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आणि यानंतर आत्ता उरलेसुरले आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने देखील नुकसानीचा धडाका लावला आहे. दरम्यान काही भागात नदीकाठच्या जमिनी अति पावसामुळे वाहून गेल्या तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत. या नुकसानीच्या पाहणीसाठी आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांना सोबत जाऊन तांदूळवाडी व जैनपूर कठोरा या भागात रविवारी पाहणी दौरा करून त्यांनी तातडीने पंचानामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
भोकरदन तालुक्यातील तांदूळवाडी व चैनपुर कोठारा येधील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या शेतजमिनी अवकाळी पावसामुळे वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार दानवे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
पूर्णा नदीवरील केटीवेअरची उंची वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर करा
अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बंधवांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. त्यांचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूर्णा नदीवरील केटीवेअरची उंची वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या, दरम्यान त्यांनी शेतकन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आमदार संतोष दानवे यांनी केला आहे. ते म्हणाले की, राज्यातील महायुती सरकार शेतकरी बांधव्र्वाच्या पाठीशी असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांनी – खचून न जाता या संकटाचा ताकदीने सामना करावा. शासन त्यांना योग्य मदत करणार आहे असे आवाहन यावेळी केले. या पाहाणी दौऱ्याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना
पूर्णा नदीवरील केटीवेअरची उंची वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच सूचना यावेळी आमदार दानवे या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नदीवरील या केटीवेअरची उंची वाढल्या या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असून सिंचनाचे वाढण्यास मदत होणार आहे. होते, मात्र त्यानंतर झालेल्या अजूनही होत असलेल्या पावसाने आनंदावर आणि उत्साहावर हरभरा, गहू आणि ज्वारी या रब्बी पिकांपैकी हरभऱ्याला चांगल मिळत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे वाढला आहे.
पडले आहे .
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जतन केलेले बियाणे वापरण्याकडे कल
या दरम्यान, योग्य वेळेत संतुलित खत दिल्यास पिकाला रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच, उत्पादनातही वाढ होते. यंदा बियाण्यांची कमतरता भासू नये म्हणून स्वतः जतन केलेले बियाणे वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तालुक्यात सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरू असून, पुढील काही दिवसात बहुतांश शेतकरी पेरणीला सुरुवात करतील. लवकर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात ठेवून सिंचन आणि कीड नियंत्रणावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.






