‘झुंड’ सिनेमाचं अलिकडेच सगळ्या दिग्दर्शकांसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगनंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) जेव्हा थिएटर बाहेर आला तेव्हा त्याने नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांना मिठी मारली. अनुरागला चित्रपट पाहून आनंदअश्रू आले.
त्यानंतर त्याने सिनेमाचं आणि नागराजचं तोंडभरून कौतुक केलं. तो म्हणाला, “मी आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांमध्ये ‘झुंड’ (jhund) हा सर्वाधिक चांगला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या रांगा लागतील. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा जाऊन फिल्ममेकिंग शिकावस वाटतंय. हा चित्रपट अप्रतिम आहे. नागराज मंजुळेने अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे. चांगल वाटतं जेव्हा कोणता दिग्दर्शक आपल्या लोकांसाठी चित्रपट बनवतो आणि त्यांच्यासाठी उभा देखील राहतो. हा फक्त अप्रतिम दिग्दर्शक नाही तर पागल आणि निडरसुद्धा आहे. या चित्रपटाच्या कास्टिंग डिरेक्टरला विशेष पुरस्कार दिला पाहिजे कारण चित्रपटात एकाच वेळी अभिनय न येत असलेलेले इतके कलाकार आणि त्यांच्याकडून असा अभिनय करून घेणं हे अप्रतिम आहे.”