संसदेत शिरला घुसखोर (फोटो- ani)
1. संसदेत शिरला घुसखोर
2. आरोपीला अटक, चौकशी सुरू
3. संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक
नवी दिल्ली: भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. लोकसभा आणि लोकसभा हे देशाच्या लोकशाहीचे मंदिर आहे. मात्र हेच लोकशाहीचे मंदिर म्हणजे संसद भवन सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण देखील असेच आहे. कारण एक व्यक्ती संसदेची सुरक्षा व्यवस्थेला चकवून गरुड द्वारापर्यन्त पोहोचल्याचे समोर आले आहे. संसद भवन परिसरात नेमके काय घडले? ते जाणून घेऊयात.
संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीने रेल्वेभवनाच्या बाजून येऊन भिंतीवरून उडी मारली आणि झाडाच्या मदतीने नवीन संसद भवनाच्या गरुड द्वारापर्यन्त पोहोचला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी कारवाई करून लगेचच या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान संसद भवनात शिरलेल्या व्यक्तीला सुरक्षरकांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. तसेच सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या चुकीचा देखील तपास केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने. रेल्वेभवनाच्या येथील असलेल्या भिंतीवरून संसद भवणाच्या परिसरात उडी मारली होती. या घटनेच्या वेळेस सुरक्षारक्षक तैनात होते. त्यांनी तातडीने या आरोपीला लगेच ताब्यात घेतले. त्यानंतर हा आरोपी कोणत्या हेतून संसद भवनात शिरला होता, याची कसून चौकशी केली जात आहे.
Parliament Attack Case: संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
आरोपीची चौकशी सुरू
रेल्वेभवनाकडून उडी मारून संसद भवन परिसरात शिरलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा इसम संसद भवनाच्या गरुड दरवाजापर्यंत पोहोचला होता. दरम्यान पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान यानंतर संसद भवन परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या आधीसुद्धा एकदा संसद भवनात असा शिरकाव करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडली गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संसद हल्ल्यातील दोन आरोपींना जामीन मंजूर
संसदेच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याची एक मोठी घटना समोर आली. या दिवशी २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वर्धापन दिनही होता. लोकसभेत शून्य प्रहरात, सागर शर्मा आणि मनरंजन डी यांनी अभ्यागतांच्या गॅलरीतून सभागृहात उडी मारली. त्यांनी सभागृहात पिवळा वायू सोडला आणि घोषणाबाजी केली. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणातील दोन आरोपी नीलम आझाद आणि महेश कुमावत यांना जामीन मंजूर केला आहे.