Rahul Gandhi (Photo Credit- X)
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’ काढत आहेत. या यात्रेत त्यांच्यासोबत ‘इंडिया’ आघाडीचे नेते आणि आरजेडीचे तेजस्वी यादवही (Tejashvi Yadav) सहभागी आहेत. 24 ऑगस्ट रोजी, जेव्हा राहुल गांधी अररियासाठी निघाले होते, तेव्हा ते बाईकवरून जात होते. त्यांच्यासोबत बाईकस्वारांची मोठी गर्दी होती. त्याच वेळी, एक व्यक्ती सुरक्षेचा घेरा तोडून राहुल गांधींच्या जवळ आला आणि त्यांना किस करून पसार झाला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राहुल गांधी स्वतः बुलेट चालवत आहेत आणि त्यांच्यासोबत बिहार काँग्रेसचे नेते बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या बुलेटवर तेजस्वी यादव आणि त्यांच्या मागे राहुल गांधींचे सुरक्षारक्षक बसलेले आहेत. याचदरम्यान, संधी साधून एक व्यक्ती राहुल गांधींच्या अगदी जवळ पोहोचला. त्या तरुणाने राहुल गांधींना पकडले आणि मिठी मारून त्यांचे चुंबन घेतले. तातडीने सुरक्षारक्षक तिथे पोहोचले आणि त्या व्यक्तीला खेचून बाजूला केले, तसेच त्याला एक कानशिलातही मारली. या घटनेनंतर सुरक्षारक्षक अधिक सतर्क झाले.
A youth from Bihar tried to hug Rahul Gandhi and kissed his shoulder with affection…!
– Earlier it went viral that he kissed Rahul Gandhi, but actually it was just a wrong camera angle. pic.twitter.com/ij2jTy267p
— زماں (@Delhiite_) August 24, 2025
During the Yatra a boy kissed Rahul Gandhi ❤️
Popularity at its Peak 🔥
— Mr. Democratic (@MrDemocratic_) August 24, 2025
राहुल गांधींच्या या यात्रेचा हा आठवा दिवस आहे. आज, रविवारी यात्रा अररिया येथे पोहोचली. त्यानंतर राहुल गांधी संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. सोमवारी यात्रेला विश्रांती देण्यात आली असून, मंगळवारी प्रियांका गांधी वाड्राही या यात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेत सध्या तेजस्वी यादव, मुकेश सहानी, भाकप (माले) नेते दीपांकर भट्टाचार्य आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही सहभाग आहे.
पूर्णिया ते अररिया प्रवासादरम्यान राहुल गांधी बुलेटवर होते आणि त्यांच्या मागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम बसले होते. राहुल गांधी या प्रवासादरम्यान लोकांमध्ये मिसळत आहेत. कधी ते ढाब्यावर थांबतात, तर कधी लोकांसोबत थांबून त्यांच्याशी संवाद साधतात. या यात्रेत लोक स्वतःहून मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी बिहारमध्ये पुन्हा एकदा ‘SIR’ (Simplified Revision of Electoral Rolls) वरून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून पोस्ट करत म्हटले आहे की, “भाजपला SIR बाबत कोणतीही तक्रार का नाही? त्यांचे मतदार वगळले गेले नाहीत का? यात्रेत मला आतापर्यंत हजारो असे लोक भेटले आहेत, ज्यांची नावे SIR मध्ये मतदार यादीतून हटवली गेली आहेत – त्यापैकी बहुतांश गरीब, दलित, मागासलेले, अल्पसंख्याक, शेतकरी आणि मजूर आहेत. हे स्पष्ट आहे की, निवडणूक आयोग आणि भाजप मिळून विरोधकांची मते मिटवण्याचे काम करत आहेत.”