ऑस्कर 2024 सोहळा (Oscar 2024) सोमवारी (11 मार्च) लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. ‘ओपनहायमर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर ‘पूअर थिंग्ज’साठी एम्मा स्टोन आणि ‘ओपेनहायमर’साठी किलियन मर्फी यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणींमध्ये ऑस्कर देण्यात आला. या सगळ्यात गेल्या वर्षी ऑस्कर जिंकलेल्या भारतीय चित्रपट ‘RRR’लाही विशेष सन्मान देण्यात आला. ‘RRR’ मधील ‘नाटू-नाटू’
(naatu naatu) गाण्याने ऑस्कर 2024 मध्ये पुन्हा एकदा कॅमिओ केला.
[read_also content=”लग्नातून परतताना वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, हाय टेंशन वायर बसवर पडल्याने लागली आग, दहा जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/india/private-bus-fired-after-contact-with-ht-line-in-ghazipur-nrps-514610.html”]
ऑस्कर 2024 मधील सर्वोत्कृष्ट गाण्याच्या सादरीकरणादरम्यान, ‘RRR’ मधील ‘नाटू-नाटू’ गाण्याची दृश्ये मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली. खरं तर, 96 व्या ऑस्करसाठी, जगभरातील काही उत्कृष्ट स्टंट दृश्यांचा समावेश असलेली क्लिप तयार करण्यात आली होती. या क्लिपमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या पीरियड ॲक्शन फिल्म ‘RRR’ ची क्लिप देखील समाविष्ट आहे. 2023 मध्ये, ‘RRR’ मधील ‘नाटू-नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर देण्यात आला होता. यावेळी ही क्लिप वाजवून विशेष सन्मान करण्यात आला.
#RRRMovie again and again at the oscars. pic.twitter.com/iEnH9Qa6Bp
— pooja gupta (@poojagu57177803) March 11, 2024
एसएस राजामौली यांचा हा पीरियड ॲक्शन चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या या चित्रपटाला लोकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 767.54 कोटींची कमाई केली होती. जागतिक स्तरावर 1106 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाला केवळ ऑस्करच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.