(फोटो सौजन्य: Pinterest)
तुम्हीही सॅमसंग युजर असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. सॅमसंग सतत त्याचा One UI इंटरफेस अपग्रेड करत आहे. कंपनीने आपल्या नवीनतम Galaxy S25 सिरीजसह अनेक कॅमेरा फीचर्स जोडले आहेत. यासोबतच कंपनीने या फोनमध्ये कस्टमाइझ करण्यायोग्य फिल्टर्स, लॉग व्हिडिओ सपोर्ट, व्हर्च्युअल अपर्चर ॲडजस्टमेंट यांसारख्या अनेक नावीन्यपूर्ण फीचर्सचा समावेश केला आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, सॅमसंग हे फीचर्स आपल्या जुन्या गॅलेक्सी स्मार्टफोन्ससाठीही शेअर करेल. हे फिचर One UI 7.1 अपडेटसह जुन्या गॅलेक्सी फोनमध्ये रिलीज केली जातील.
जुन्या डिव्हाइसेसना मिळणार ॲडव्हान्स फिचर
सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये संकेत दिले की ते जुन्या मॉडेलसाठी देखील फिचर आणेल. Samsung Galaxy S25 सिरीज स्थिर One UI 7 व्हॅरियंटसह रिलीज करण्यात आली आहे. नवीनतम Galaxy S25 सिरीज एकूण सहा नवीन कॅमेरा फिल्टरसह आणली गेली आहे. यासह, सॅमसंगने कस्टम फिल्टर्स देखील लाँच केले आहेत, ज्याच्या मदतीने युजर्स 50 स्तरांपर्यंत रंग तापमान, कॉन्ट्रास्ट आणि संपृक्तता फिल्टर करू शकतात. यासह, एआय आधारित कस्टम फिल्टर्सद्वारे प्रतिमा गुणवत्ता वाढवण्याचे वैशिष्ट्य देखील असेल.
सॅमसंगची प्रगत कॅमेरा फीचर्स
या अपडेटसह, सॅमसंग फोनला प्रो मोडसह लॉग व्हिडिओ (Log Video) सपोर्ट मिळेल. या फीचरच्या मदतीने यूजर्स प्रोफेशनल व्हिडीओग्राफरप्रमाणे त्यांचे व्हिडिओ एडिट करू शकतील. या सॅमसंग फोनमध्ये 10-बिट एचडीआर व्हिडिओ पर्याय असेल. यासोबतच, HDR10+ आणि Hybrid Log Gamma चे एकत्रीकरण व्हिडिओ निर्मितीमध्ये जबरदस्त कॉलीटी प्रदान करेल.
सॅमसंगचे आणखी एक फिचर म्हणजे व्हर्च्युअल अपर्चर देखील खूप लोकप्रिय होत आहे. जे युजर्सना मोशन फोटो आणि पोर्ट्रेटमध्ये DSLR कॅमेरा सारखी खोली देईल. ही सर्व युजर्सना Galaxy S25 मधील फोटोग्राफीचा अनुभव सुधारतात. अहवालांवर विश्वास ठेवला तर, सॅमसंगने सादर केलेली ही सर्व प्रगत फिचर One UI 7.1 सह जुन्या गॅलेक्सी डिव्हाइसेसमध्ये उपलब्ध असतील.
आता सेट-टॉप-बॉक्सची गरज नाही! BSNL सिम युजर्स फोनवरच पाहू शकतात लाईव्ह टीव्ही
सॅमसंगमध्ये मिळणार आयफोनसारखे फिचर
आम्ही तुम्हाला सांगतो की, यासोबतच यूजर्सना सॅमसंगच्या नाऊ बारमध्ये गुगल मॅप्सचा (Google Maps) सपोर्टही मिळेल. यासह, युजर्स आयफोनप्रमाणे होम स्क्रीनवर नेव्हिगेशन इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकतात.