चंद्रपूर : वाघाची शिकार हा नेहमी उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. फार कमी लोकांना ती याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळते. चंद्रपूरमधील (Chandrapur) ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये (Tadoba Tiger Reserve) पर्यटकांना वाघाची शिकार (Tiger Hunting) अगदी डोळ्यासमोर पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. पर्यटकांसमोर वाघाने अतिशय शांततेमध्ये योग्य नेम साधत रानडुक्कराची शिकार केली. या शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ताडोबा (Tadoba) अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेकांनी सुट्टीच्या निमित्ताने ताबोडाची सफर बुक केली आहे. ताडोबामध्ये वाघ पाहणे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनत आहे.
FLASH: Adventures of hunting in Tadoba national park in Maharashtra- Tiger hunts wild boar, video goes viral#Tadoba #tigerheart pic.twitter.com/PSW6xsvFp7
— The New Indian (@TheNewIndian_in) January 9, 2024
दरम्यान पर्यटाकांना आता तर वाघाची शिकार देखील पाहता आली आहे. वाघाने पर्यटकांच्या समोरच रानडुकराची शिकार केल्याचा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रानडुक्कर दिसताच अतिशय शांत चित्ताने व एकाग्रतेने वाघाने त्याची शिकार केली. शिकार केल्यानंतर जंगलात नेऊन तो फस्त देखील केला. सध्या या शिकारीचा थरारक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.