नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींहून अधिक झाली आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते (Political Leaders) पुढे सरसावले आहेत. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी आता ट्विटरने (Twitter) देखील भारताला मदतीचा हात दिला आहे.
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरने १५मिलियन ($15 million) डॉलर्स म्हणजेच ११० कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
$15 million split between @CARE, @AIDINDIA, and @sewausa to help address the COVID-19 crisis in India. All tracked here: https://t.co/Db2YJiwcqc ??
— jack (@jack) May 10, 2021
ही रक्कम केअर (CARE), एड इंडिया (Aid India) आणि सेवा इंटरनेशनल यूएसए (Sewa Internationa USA) या तीन संस्थांना दान करण्यात आली आहे. यामध्ये केअरला १कोटी डॉलर्स तर एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल यूएसएला अडीच मिलियन डॉलर्स देण्यात आले आहेत, असं म्हटलं आहे.