File Photo : Parliament
लखनौ : उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) सहा टप्पे पूर्ण झाले असून, आता फक्त शेवटच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. यावेळी देशातील सर्वाधिक खासदार असलेल्या उतर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 16 जागा आहेत, जिथे निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार असे आहेत, जे यापूर्वी कधीही संसदेत पोहोचले नाहीत.
उत्तर प्रदेशातील ज्या जागांवर भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ आणि सपा-काँग्रेस इंडिया आघाडीने नवीन उमेदवार उभे केले आहेत (मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसह) गाझियाबाद, मेरठ, बिजनौर, नगीना, कानपूर, हाथरस, बाराबंकी, बदाऊन, घोसी, बागपत, प्रयागराज, कैसरगंज, फुलपूर, बहराइच, जौनपूर आणि देवरिया लोकसभा जागांचा यात समावेश आहे.
गाझियाबाद-अतुल गर्ग- भाजपा, डॉली शर्मा (काँग्रेस), बागपत राजकुमार सांगवान – आरएलडी अमरपाल शर्मा (सपा), जौनपूर-कृपाशंकर सिंग, भाजप, बाबू सिंग कुशवाह-सपा, बाराबंकी राजरानी रावत भाजप, तनुज पुनिया (काँग्रेस), कैसरगंज करण भूषण सिंग (भाजप) भगत राम मिश्रा (सपा), देवरिया प्रकाश मणी भाजप अखिलेश प्रताप (काँग्रेस), बहराइच आनंद गोंड (भाजप) यांच्यासह इतर उमेदवारांचा समावेश आहे.