PM Modi and World Champion team India Meeting : विश्वविजेत्या टीम इंडियाचे गुरुवारी 4 जुलै रोजी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडियाच्या खेळाडूंचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया काही तासांच्या विश्रांतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेली. पंतप्रधान मोदी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. विश्वचॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक खेळाडूसोबत वन-टू-वन चर्चा केली. प्रत्येक खेळाडूची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्या फायनल मॅचबद्दलचे मजेदार किस्सेदेखील जाणून घेतले. अखेर सर्व काही स्पष्ट झालंय. मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसह काय चर्चा केली, हे जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत केली चर्चा
Our World T20 🏏 Champions enthralled everyone with their outstanding performances. Had a wonderful conversation with them. Do watch! https://t.co/1UPGbCmx6F
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024
पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसह वन टू वन संवाद साधला. पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक चौकशी केली. तसेच वर्ल्ड कप फायनल सामन्यात त्या क्षणी काय काय झालं? त्या क्षणी तुमच्या डोक्यात काय सुरु होतं? असं सर्वकाही मोदींनी विचारलं. यावर प्रत्येक खेळाडूंनी आपली भावना व्यक्त केली.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश
येत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यानंतर काय आता त्याची तयारी कशी करणार असा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी राहुल द्रविड यांना विचारला. कारण येत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला आशा आहे यापैकी अनेक खेळाडू हे त्या संघाचा भाग असतील. त्यामुळे मला खात्री आहे की, यातील अनेक खेळाडू त्यामध्ये दर्जेदार कामगिरी करतील.