हार्ट अटॅक येण्याच्या १ महिना आधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, छातीतील वेदनांसह इतर अवयवांमध्ये दिसतात संकेत
हार्ट अटॅकची लक्षणे?
हार्ट अटॅक येण्याची कारणे?
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय खावे आणि खाऊ नये?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तरुण वयातील मुलांमुलींपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. हृदयविकाराचे वाढते प्रमाण पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष केले जात नाही. सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केलेली लक्षणे कालांतराने जीवघेणी ठरतात. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता आणि कामाचा वाढता तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीर कमकुवत होत जाते.(फोटो सौजन्य – istock)
साठीनंतर शरीर साथ देत नाही? मग रोजच्या जीवनात करा ‘हे’ छोटे बदल
हार्ट अटॅक येण्याचे प्रमुख कारण म्हणजे रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास सुरुवात होते. ज्याच्या परिणामामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि आरोग्य बिघडते. हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसणारी लक्षणे.
दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी तळलेले आणि तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले पॅकेज्ड स्नॅक्स, अति मीठ, लाल मांस, साखरयुक्त पेये आणि बेकरी उत्पादनांचा आहारात अजिबात समावेश करू नका. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, सुकामेवा, बिया, ऑलिव्ह ऑइल इत्यादींचा आहारात समावेश करावा.
Ans: छातीत वेदना, सतत थकवा, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे, चक्कर येणे आणि हात, मान किंवा जबड्यात वेदना अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: छातीत दडपण, जळजळ, जडपणा किंवा घट्ट पकडल्यासारखी वेदना जाणवू शकते. काही वेळा ही वेदना डाव्या हातापर्यंत पसरते.
Ans: होय. महिलांमध्ये थकवा, मळमळ, अपचन, पाठदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे अधिक दिसू शकतात.






