कोणत्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक
दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ साजरा केला जातो. चांगल्या आरोग्यासाठी पोषणाच्या उपयुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात सकस आहार घेणे खूप गरजेचे आहे. ज्याप्रमाणे इंजिनला पेट्रोल आणि डिझेल लागते, त्याचप्रमाणे शरीराला चालण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते.
शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी 15 पोषक तत्वांची गरज असते. पण काळानुरूप बदलत्या खाद्यपदार्थांच्या ट्रेंडमुळे ते लोकांच्या ताटातून पूर्णपणे गायब झाले आहेत. त्यामुळे लोक कमी वयातच गंभीर आजारांना बळी पडत आहेत. यासाठी नक्की काय करावे याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
काय होतात चुका?
पोषण नसलेले पदार्थ अधिक खाल्ले जातात
बहुतेक लोक वेळोवेळी पोटभर जेवतात, पण त्यातून शरीराला आवश्यक प्रमाणात पोषण मिळत आहे की नाही याकडे लक्ष देत नाही. विशेषत: मुले आवश्यक प्रमाणात पोषण आहार घेऊ शकत नाहीत आणि कुपोषणाला बळी पडतात. आपल्या आहारात कोणते पदार्थ आहेत आणि त्यातून काय पोषण मिळत आहे याचा विचारच केला जात नाही.
हेदेखील वाचा – उकडूनच खायला हव्यात या 5 भाज्या, पोषक तत्व राहतील टिकून घाण जाईल निघून
भारतात सर्वाधिक कुपोषण
भारतामध्ये होते सर्वाधिक कुपोषण
मार्च 1973 मध्ये अमेरिकन डायटेटिक्स असोसिएशनने युनायटेड स्टेट्समध्ये ‘NNW’ आकडे पहिल्यांदा सादर केले. त्या काळात भारतातील सर्वाधिक मुले कुपोषणाला बळी पडली होती. या समस्येवर मात करण्यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षी ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ची थीम ‘सर्वांसाठी पोषक आहार’ अशी आहे.
आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व
कोणत्या पदार्थांमधून मिळते पोषक तत्व
निरोगी शरीरासाठी जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, चांगले फॅट्स, पाणी आणि कार्बोहायड्रेट खूप महत्वाचे आहेत. या अत्यावश्यक पोषक घटकांची दोन प्रकारांमध्ये विभागणी केली आहे. प्रथम सूक्ष्म पोषक घटक आहेत ज्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. मॅक्रोन्यूट्रिएंट्स हे असे पोषक तत्व आहेत ज्यांची शरीराला जास्त गरज असते. त्यात पाणी, प्रथिने, कर्बोदके आणि चरबी यांचा समावेश होतो.
हेदेखील वाचा – ‘स्वास्थ शुद्धी’ द्वारे पोषक आहार युक्त भारत करण्याचा निर्धार
आहारात कोणते पौष्टिक तत्व असावे?
आहारात पोषक तत्वांची गरज
पौष्टिक घटकांमध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, आयोडीन, लोह, रिबोफ्लेविन, फोलेट, झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम, थायामिन, नियासिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 यांचा आहारात समावेश करणे खूप महत्वाचे आहे. हे सर्व पोषक तत्व शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. अन्नामध्ये या पोषक तत्वांचा समावेश केल्यास शरीर अनेक गंभीर आजारांपासून दूर राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच ते शरीराला तंदुरुस्त ठेवतात.